Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मतदान करण्याचे आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मतदान करण्याचे आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 18, 2024 9:18 PM

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा
Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार 

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मतदान करण्याचे आयुक्तांचे आदेश

 

Vidhansabha Election voting – (The Karbhari News Service) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान केल्याचे सुनिश्चित करावे. असे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत विविध निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांमध्ये कार्यालयीन आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना मतदानास सहभाग करण्यास प्रवृत्त करण्याचा देखील समावेश आहे.

त्याअनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यालयामध्ये कार्यरत मनपा अधिकारी / कर्मचारी, हंगामी, कंत्राटी तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मतदानाचे दिवशी मतदान करणेबाबत प्रबोधन करावे. तसेच त्याबाबत त्यांना अवगत करावे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फ़त वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0