PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम! 

Homeadministrative

PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम! 

Ganesh Kumar Mule Mar 21, 2025 8:58 PM

PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 
Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक ची जबाबदारी | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश 
PMC commissioner gave strict instructions to the officials in the meeting of HODs

PMC Employees Promotion | अखेर उप अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना अधीक्षक पदी मिळाली पदोन्नती! | The कारभारी च्या बातमीचा परिणाम!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – उप अधिक्षक ते अधिक्षक पदोन्नती प्रक्रियेची फाईल महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेसाठी ११ मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेली होती.  मात्र १० दिवस उलटून गेले तरी महापालिका आयुक्त यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झालेली नव्हती. याबाबत The कारभारी (The Karbhari) वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rahendra Bhosale IAS) यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. शिवाय ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांना नेमणुका देखील दिल्या आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रेन (M J Pradip Chandren IAS) यांनी आदेश जारी केले आहेत. याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का?

महापालिकेत वर्षानुवर्षे काम केल्यानंतर महापालिका कर्मचारी आपल्या पदोन्नतीला पात्र होतात. ही पदोन्नती त्यांच्या हक्काची असते. मात्र त्यांच्या हक्काचा गोष्टी देण्यात महापालिका प्रशासन नेहमी उदासीन असल्याचे दिसून येते. पदोन्नती प्रक्रियेचे प्रस्ताव कधी अतिरिक्त आयुक्त अडवून ठेवतात, तर कधी आयुक्त. मात्र असे प्रस्ताव आयुक्त अडवून ठेवतात, असे फार दुर्मिळ वेळा होते. मात्र आता महापालिका आयुक्त यांनीच उप अधीक्षक ते अधीक्षक या पदाची पदोन्नती प्रक्रिया अडवून ठेवली होती. विशेष हे की, यातील काही कर्मचारी याच महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे The कारभारी ने हे वृत्त प्रसारित करत, महापालिका आयुक्त यांना प्रश्न केला होता कि, सेवकांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी देणार का? (Pune Municipal Corporation – PMC)

याची दखल महापालिका आयुक्त यांनी घेत ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांना नेमणुका देखील दिल्या आहेत. या सोबतच आज वरिष्ठ लिपिक या पदावरील सेवकांना देखील उप अधीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. हे देखील ३० कर्मचारी होते. त्यांना देखील नेमणुका दिल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीतील खात्यात ३१ मार्च पर्यंत काम करायचे असून १ एप्रिल पासून नेमणूक दिलेल्या खात्यात काम करायचे आहे. असे महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रेन यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.


‘The कारभारी’ च्या दणक्यामुळे आज लेखनिक संवर्गाची वरिष्ठ ते उपअधीक्षक व उपाधीक्षक ते अधीक्षक पदाची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केले आहेत. याबाबत युनियनने प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच प्रशासन अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी अनुभवाची अट शिथिल करण्यात येऊन त्या जागेवर सेवकांना पदोन्नती देण्याची मागणी अध्यक्षांनी  आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच उपाधीक्षक व प्रशासन अधिकारी 75% पदोन्नती 25% सरळ सेवा असल्याने 25% ची अनेक पदे रिक्त आहेत. ती अट रद्द करून 100% पदोन्नती केल्यास सेवकांना वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळेल. त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात यावा अशी मागणी संघटनेची आहे.

  • बजरंग पोखरकर
    अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉइज युनियन पुणे महानगरपालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: