BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा

BJP Pune Central Office

HomeBreaking News

BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा

Ganesh Kumar Mule Apr 04, 2025 6:53 PM

BJP state executive meeting in Pune | पुणे आणि कर्नाटक पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची उद्याची महत्वाची बैठक 
PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 
Pune Airport New Terminal | लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल झाले ; पण, प्रवासी अद्याप सुविधांपासून वंचितच

BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा

 

Pune BJP – (The Karbhari News Service) – भाजपच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त शहर भाजपच्या वतीने 6 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील कार्यालयात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेह-मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कळविली आहे. (Pune News)

घाटे म्हणाले, “सकाळी आठ वाजता शहर कार्यालयात ध्वजवंदन आणि राम नवमी निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.”

घाटे म्हणाले, “शहरात भाजपने साडेपाच लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. 9 हजार सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य नजीकच्या काळात पूर्ण केले जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त शहरातील 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे.”

घाटे पुढे म्हणाले, 6 एप्रिल पासून शहरातील बुस्तरावरील नियुक्त्या पूर्ण केल्या जाणार आहेत भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवणार आहेत सर्व कुटुंबीयांसह सेल्फी काढण्यात येणार आहे या दिवशी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत विविध प्रकारचे सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता किमान आठ तास गाव व वस्तीमध्ये प्रवास करणार आहे. तसेच स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विविध योजनांमधील किमान 10 लाभार्थ्यांची प्रत्येक कार्यकर्त्याद्वारे संपर्क साधला जाणार आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: