Illegal Hoardings| अनधिकृत होर्डिंगवर पुढील आठवड्यात धडक कारवाई : मंगळवारपर्यंत परवानगीच्या प्रती जमा करण्याचे न‍िर्देश

सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनेची बैठक प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात झाली.

Homeadministrative

Illegal Hoardings| अनधिकृत होर्डिंगवर पुढील आठवड्यात धडक कारवाई : मंगळवारपर्यंत परवानगीच्या प्रती जमा करण्याचे न‍िर्देश

Ganesh Kumar Mule Apr 03, 2025 8:44 PM

Pune Hoardings News | अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक
PMC Sky Sign Department | राजकीय पक्षांनी  अनधिकृत होर्डिंग उभारल्यास कारवाई करण्याचे पुणे महापालिका आकाशचिन्ह विभागाचे आदेश
Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Illegal Hoardings| अनधिकृत होर्डिंगवर पुढील आठवड्यात धडक कारवाई : मंगळवारपर्यंत परवानगीच्या प्रती जमा करण्याचे न‍िर्देश

 

| पीएमआरडीएमधील बैठकीत न‍िर्णय

 

PMRDA Pune – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्यात येणार आहे. ८ एप्रिलपर्यंत संबंध‍ितांनी होर्डिंगच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांच्या प्रती कार्यालयात सादर करावेत, अन्यथा पुढील आठवड़यात अनधिकृत होर्डिंग एकतर्फी काढण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी (दि.२) सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनेची बैठक प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात झाली. बैठकीत अनधिकृत होर्डिंगला परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग त्वरीत काढून घेणे यासह संघटनेच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. (Pune News)

पुढील दोन दिवसात अवकाळी, वादळी वाऱ्याच्या हवामान अंदाजानुसार धोकादायक होर्डिंग काढण्याचे न‍िर्देश बैठकीत देण्यात आले. यासह ८ एप्रिलपर्यंत परवानगीसाठी दाखल प्रस्तावांच्या प्रती सादर कराव्यात अन्यथा संबंध‍ित होर्डिंग निष्कासन कारवाई करण्यात येईल. यापुढे प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन आकाशचिन्ह उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या सह आयुक्त (प्र) डॉ. दिप्ती सुर्यवंशी – पाटील यांनी केले. बैठकीस उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार रविंद्र रांजणे, तहसिलदार सचिन मस्के, सहायक नगर रचनाकार राहुल गिते, शाखा अभियंता विष्णू आव्हाड, ऋतुराज सोनवणे, दिप्ती घुसे, विशाल भोरे, होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे, उपाध्यक्ष शेखर मते यांच्यासह आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्वाचे न‍िर्णय

• अवकाळी, वादळी वाऱ्यामुळे रहदारीच्या जागेसह मुख्य चौकातील होर्डिंग काढणे. असे न झाल्यास होणाऱ्या दुर्घटनेस होर्डिंगधारकास जबाबदार धरत नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
• विशेष: हिंजवडी परिसर, हवेली तालुका वाघोली, मांजरी, नऱ्हेसह सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, पुणे- सातारा रोड, पौड रोड, हडपसर दिवे घाट, पुणे-सोलापूर रोड, पुणे-नाशिक रोड, पुणे-नगर रोड, सुस रोड, तळेगाव -चाकण – शिक्रापूर रोड तसेच वर्दळीच्या ठिकाणचे होर्डिंग काढून घेण्यात यावेत.
• होर्डिंग धारकांनी ८ एप्रिलपर्यंत परवानगी प्रकरणाबाबतची यादी कार्यालयास द्यावी. अन्यथा सर्व होर्डिंग अनधिकृत समजून त्या काढण्यात येईल.
• परवानगीशिवाय नव्याने होर्डिंग उभारु नये, निदर्शनास आल्यास त्या एकतर्फी काढण्यात येतील.
• एका होर्डिंगच्या संरचनेवर दोन किेवा जास्त होर्डिंग लावण्यात येऊ नये.
• नागरी क्षेत्रामध्ये रस्त्याचा आरक्षित पट्टा (ROW) तसेच रस्त्याच्या रेषेच्या आतमध्ये होर्डिंग उभारु नये. होर्डिंगचा भाग ROW मध्ये असल्यास कारवाई करण्यात येईल.
• सद्यस्थितीत असणाऱ्या होडिंगला पत्रा / डबल संरचना केलेली कापड / वाऱ्यास अडथळा करणारे फलक काढून टाकावेत.
• होर्डिंगबाबत अनुचित दुर्घटना घडल्यास होर्डिंगमालक, फलकावर असणाऱ्या जाहिरातीचा व जागा मालक यांना जबाबदार धरण्यात येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: