कॉंग्रेस तर्फे पोस्टमन काकांची भाऊबीज साजरी
: भरत सुराणा यांच्या तर्फे उपक्रमाचे आयोजन
पुणे : करोना काळात घरो घरी जाऊन पत्र व पार्सल देण्याची सेवा देत पोस्टमन यांनी करोना योद्धा म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे प्रभाग क्रमांक 28 मधिल “पोस्टमन काका” यांना काँग्रेस महिलांकडून औक्षण करून “भाऊबीज” अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी पोस्टमन यांनी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात दिवाळी निमित्त सर्वान साठी फराळ कार्यक्रम आयोजित करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस योगिता सुराणा व काँग्रेस कार्यकर्ता भरत सुराणा यानी केले होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे ,महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र सरचिटणीस अभय छाजेड, चेतन अगरवाल कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सिलार रतनगिरी, सिमा महाडिक, रमेश सोनकांबळे,सचिन आडेकर,नितीन जैन,रमेश जाधव सर,अनुसया गायकवाड, रजिया बल्लारी, हलिमा शेख,अल्ताफ सौदागर,विश्वास दिघे,भारत काळे, धर्म काब॔ळे, सुरेश चोधरी आदी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगीलालजी सोळंकी यांनी केले
कोरोना मधे पोलिसांचा, डॉक्टरांचा,सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला परंतु घरोघरी जाऊन आपले महत्त्वाचे पत्र देण्याचे कर्तव्य आम्ही करत होतो पोस्टमन म्हणून आम्ही केलेल्या कामाची दखल कोणी घेतली नाही गेले दोन वर्षा पासून भरत सुराणा, व योगिता सुराणा हा उपक्रम करून आम्हाला देत असलेल्या भाऊबीज सन्माना मुळे आनंद होत आहे.
COMMENTS