Pune Unlock : सोमवार च्या  ऐवजी मंगळवार पासून सुरु होणार कॉलेज

HomeपुणेPMC

Pune Unlock : सोमवार च्या  ऐवजी मंगळवार पासून सुरु होणार कॉलेज

Ganesh Kumar Mule Oct 09, 2021 1:56 PM

MAHAPREIT : PMC : उर्जा बचत प्रकल्पासाठी ‘महाप्रित’चा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार
Financial provision | वित्तीय समितीने मंजूरी दिलेल्या आर्थिक तरतुदीचे आवश्यकता भासल्यास विभाजन | अतिरिक्त आयुक्तांची घ्यावी लागणार मंजूरी 
 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management Department

सोमवार च्या  ऐवजी मंगळवार पासून सुरु होणार कॉलेज

: महापालिका  आयुक्तांचे आदेश

पुणे : पुण्यात सोमवारपासून विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरु करणार आहोत. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना  rtpcr बंधनकारक असल्याची घोषणा  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी देखील शुक्रवारी रात्री आदेश जारी केले होते. मात्र आयुक्तांनी शनिवारी हा आदेश बदलत महाविद्यालय मंगळवार पासून सुरु करणार असल्याचे घोषित केले आहे.


यामध्ये महाविद्यालय सोबत कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्था याचा देखील समावेश आहे. शहरात संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जिल्ह्याबाहेरीलही विद्यार्थी विद्यापीठात येतात. त्यामुळे त्यांनी दोन डोस घेण्याबरोबरच आरटीपीसार टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. अशा सूचना कॉलेज आणि हॉस्टेलला देण्यात आल्या आहेत.  दरम्यान कॉलेज आणि क्लासेस आता सोमवार ऐवजी मंगळवार पासून सुरु होतील. कारण राज्यात महाविकास आघाडी सरकारने सोमवारी लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. त्यामुळे हा निर्णय बदलला असल्याची चर्चा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0