Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून फायरमन पदाचा निकाल घोषित

HomeपुणेBreaking News

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून फायरमन पदाचा निकाल घोषित

Ganesh Kumar Mule Jul 07, 2023 4:51 PM

MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार |  मंत्री उदय सामंत | आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न 
PMC Security Department | 11 हजार कोटींचे बजेट असणाऱ्या पुणे महापालिकेकडे २०० बॅरिकेट्स घ्यायला नाहीत पैसे!
Hydrogen Gas | महापालिकेच्या हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्पाची निरी करणार तपासणी! | 12 लाखांचा येणार खर्च

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून फायरमन पदाचा निकाल घोषित

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट (PMC Website) वर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. फायरमन च्या 200 जागांसाठी 3555 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti Results 2023)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक / फायरमन वर्ग-३ संवर्गातील रिक्त जागा भरणेसाठी जाहिरात ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार उपरोक्त पदाची २२/०६/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल व कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुषंगाने कागदपत्रे तपासणीकामी स्वतंत्ररीत्या वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल. असे इथापे यांनी सांगितले. (PMC Pune Bharti Results 2023)

: या संकेतस्थळावर पहा निकाल

News Title | Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 |  Pune Municipal Corporation announced the result of fireman post