PMC Standing Committee | चांदणी चौक – भूगाव मार्गसाठी २०० कोटींची रक्कम देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला  | ७२ ब च्या सर्व प्रस्तावांची  स्थायी समिती ने मागितली माहिती

Homeadministrative

PMC Standing Committee | चांदणी चौक – भूगाव मार्गसाठी २०० कोटींची रक्कम देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला  | ७२ ब च्या सर्व प्रस्तावांची  स्थायी समिती ने मागितली माहिती

Ganesh Kumar Mule Mar 27, 2026 8:44 PM

Ganeshkhind Road Shivajinagar | चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल दरम्यानच्या 45 मी डी.पी. रस्तारुंदीसाठी 52 मिळकती कायद्याद्वारे घेतल्या जाणार ताब्यात! 
Shirnath Bhimale on Overhead Cable | धोरण होईपर्यंत ओव्हरहेड केबलची कारवाई थांबणार | केंद्र आणि राज्याच्या गाईडलाइन्स चा अभ्यास करून ८ दिवसात प्रशासन नियमावली बनवणार 
Double benefit of PMC Solid Waste Management Special Scod Vehicle 

Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्गसाठी २०० कोटींची रक्कम देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला  | ७२ ब च्या सर्व प्रस्तावांची  स्थायी समिती ने मागितली माहिती

| समिती सदस्य नसताना  स्थानिक नगरसेवकांच्या प्रस्ताव मान्य करण्याच्या  मागणीने आश्चर्य

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – चांदणी चौक-भूगाव मार्गाच्या पुनर्विकासाठी पुणे महापालिकेने या मार्गासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. दरम्यान ही रक्कम आगामी तीन वर्षात टप्प्याटप्प्याने अर्थसंकल्पात उपलब्ध केली जाणार आहे. ७२ ब नुसार रक्कम उपलब्ध करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. दरम्यान हा प्रस्ताव मान्य करावा म्हणून समिती सदस्य नसताना देखील स्थानिक नगरसेवकाने समितीत ठिय्या मांडत मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  (PMC Projects Department)

चांदणी चौक-भूगाव या मार्गावरील वाहतूक कोंडी नेहमीची होऊन बसली आहे. सध्या आसपासचा परिसर अंदाजे ९० हजार लोकसंख्येचा असून पुढील काही वर्षांत हा आकडा दोन ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत वाहतूक नियोजन तातडीने करावे लागणार आहे. या दृष्टीने प्रकल्पाच्या डिटेल प्लॅनिंगसाठी मेसर्स पेंटॅकल कन्सल्टंट्स प्रा. लि.ची ३० जुलै रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कामासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात आली असून फेज १ अंतर्गत ६७.८५ कोटी आणि फेज २ अंतर्गत १३५.७६ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान यासाठी २०० कोटींची रक्कम आगामी तीन वर्षात टप्याटप्याने उपलब्ध करण्याबाबत स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव समितीने पुढे ढकलला आहे.

याबाबत समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले कि, ७२ ब नुसार ही रक्कम देण्याबाबत प्रस्ताव होता. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली कि आम्हाला ७२ ब च्या सर्व प्रस्तावांची माहिती द्या, त्यामुळे आम्हाला तरतुदी बाबत अंदाज येईल. पुढील बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात येईल.

दरम्यान हा प्रस्ताव मान्य करण्याची घाई समिती पेक्षा समिती तील सदस्य नसलेल्या स्थानिक नगरसेवकांना होती. त्यामुळे त्यांनी अचानक स्थायी समितीत येत प्रशासनाचा हा प्रस्ताव मान्य करण्याची मागणी केली. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता समिती बैठकीत आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विरोधी पक्षांनी देखील यावर आक्षेप घेत असे प्रकार आगामी काळात खपवून घेणार नसल्याचे सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: