PMC Standing Committee | शिंदेवाडीत १६० टीपीएच क्षमतेच्या डांबरी मिश्रण प्रकल्पाचा मार्ग मोकळा | पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीला काम

Homeadministrative

PMC Standing Committee | शिंदेवाडीत १६० टीपीएच क्षमतेच्या डांबरी मिश्रण प्रकल्पाचा मार्ग मोकळा | पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीला काम

Ganesh Kumar Mule Aug 20, 2026 7:19 PM

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
Shrinath Bhimale PMC | पुढील आठवड्यापासून महसूल वाढ समितीच्या बैठका  | महिनाभरात सीएसआर कक्षाची उभारणी पूर्ण होणार |  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
PMC Standing Committee | मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाचा होणार विस्तार  | मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला स्थायी समितीचा हिरवा कंदील

PMC Standing Committee | शिंदेवाडीत १६० टीपीएच क्षमतेच्या डांबरी मिश्रण प्रकल्पाचा मार्ग मोकळा | पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीला काम

दक्षिण पुण्याला जलद पुरवठा, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेच्या येरवडा येथील जुन्या डांबरी मिश्रण प्रकल्पावरील ताण कमी करण्यासाठी शिंदेवाडी येथे १६० टीपीएच क्षमतेच्या दोन नव्या बॅच मिक्स प्लान्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ८ कोटी ९० लाख ९० हजार रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीची निविदा बी-२ पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Parker Plant India Pvt Ltd)

येरवडा येथे १२० टीपीएच क्षमतेचा बॅच मिक्स प्लान्ट २०१६ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून सुमारे सात ते साडेसात लाख मेट्रिक टन डांबरी मिश्रणाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंत्रसामग्रीचे सुटे भाग झिजल्याने प्रकल्प वारंवार बंद पडत असून, मागणीनुसार डांबरी मालाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी नवीन प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते.

या कामासाठी २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. चार निविदा प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन पात्र ठरल्या. पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. ही एल-१ निविदाधारक ठरली. कंपनीच्या प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करून निविदेतील आवश्यक बाबींची खातरजमा करण्यात आली. बी-२ पद्धतीने निविदा निश्चित करताना कामाची व्याप्ती कमी करून सुमारे ८.९१ कोटी रुपयांपर्यंत काम करून घेण्याचे नियोजन आहे.

शिंदेवाडी येथील महापालिकेच्या सुमारे ५.३६ एकर जागेवर हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या जागेचा सध्या पीएमपीएलकडून टायर, ड्रम आणि जुन्या वाहनांसारखे भंगार साहित्य ठेवण्यासाठी वापर होत आहे. नवीन प्लान्टमुळे कात्रज, गुजरवाडी, कोळेवाडी, उंड्री, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी, धनकवडी, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर तसेच दक्षिण पुण्यात नव्याने समाविष्ट गावांना डांबरी मिश्रणाचा जलद पुरवठा करता येणार आहे.

येरवडा प्लान्टवरील ताण होणार कमी
नवीन शिंदेवाडी येथील प्लान्ट कार्यान्वित झाल्यानंतर येरवडा येथील विद्यमान प्लान्टवरील उत्पादनाचा ताण कमी होणार आहे. दक्षिण पुण्यातील विविध भागांसाठी डांबरी मिश्रणाची वाहतूक करण्यासाठी लागणारा वेळही कमी होण्याची अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली.

२१ हजार ७०० चौरस मीटर जागा

शिंदेवाडी जकात नाक्याची सुमारे २१ हजार ७०० चौरस मीटर अर्थात ५.३६ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. या जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य पडून असल्याने त्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: