PMC Gadikhana | गाडीखाना दवाखान्याच्या विकासकामांसाठी ९७ लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता!

HomeBreaking News

PMC Gadikhana | गाडीखाना दवाखान्याच्या विकासकामांसाठी ९७ लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता!

Ganesh Kumar Mule Mar 27, 2026 9:05 PM

Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 
Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 
Gunthewari Regularisation | चार वेळा मुदतवाढ देऊनही फक्त 835 प्रस्ताव आले | त्यापैकी फक्त 21 मान्य झाले!

PMC Gadikhana | गाडीखाना दवाखान्याच्या विकासकामांसाठी ९७ लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता!

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  कसबा मतदारसंघातील गाडीखाना दवाखान्यात विविध विकास कामांसाठी सुमारे ९७.९६ लाख रुपयांच्या निविदेला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Standing Committee)

महापालिकेच्या भवन विभागामार्फत या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या कामाच्या एकूण खर्चात जीएसटी, रॉयल्टी आणि मटेरिअल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, एकूण खर्च सुमारे ९७.९६ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षात या कामासाठी अंदाजपत्रकात सुमारे ९५.२० लाख रुपयांचीच तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध निधीनुसार टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने गाडीखाना दवाखान्यातील विकासकामे महत्त्वाची मानली जात आहेत. या कामांमुळे दवाखान्याची पायाभूत सुविधा सुधारून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा भिमाले यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: