Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

HomeBreaking Newsपुणे

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

गणेश मुळे May 07, 2024 4:53 AM

Chandrakant patil : Prashant Jagtap : प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका…
Congress Vs Chandrakant Patil : हिंदू आहोत हिंदुत्ववादी नाही.! : कॉंग्रेसचा पलटवार
Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

 

Pune Cantonment Constituency- (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha) पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ (Pune Cantonment Constituency) निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला हा मतदारसंघ परिवर्तनास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Loksabha Election 2024)

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू शकते याचा आढावा घेतला तर यंदा भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होणार आहे. मुख्यत्वे वडगावशेरी , पुणे कॅंटोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहे. इतकेच नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन घडू शकते.अशी स्थिती आहे. त्यात सहाही विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते.असे राजकीय अभ्यासकांचे ठाम मत आहे.

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान पाहता, महायुती पर्यायाने भाजपला ६७,१७७ तर महा विकास आघाडीला ५४,४४४ मते आणि वंचितला १४,६९९ व अन्य असे एकूण १,४०,३६४ मतदान झाले. यंदा या मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ४०० मतदारांपैकी पुरुष १लाख ४३ हजार ०४५,महिला १लाख ३७ हजार ३२२ तर ३३ तृतीय पंथीय मतदार आहेत.सद्यस्थितीत इंडिया फ्रंटच्या एकीमुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडी सरस ठरली आहे. गतवेळी मत विभाजनासाठी वंचित कारणीभूत ठरल्याची चर्चा जोरात झाली होती. मात्र भाजपची बी टीम म्हणून वंचितची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे यंदा महायुतीच्या मतांचे समीकरण बिघडण्यास वंचितच कारणीभूत ठरणार आहे. त्यात एमआयएमही स्वतंत्रपणे रिंगणात असली तरी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार आहे. आंबेडकरी चळवळीचे तसेच मुस्लिम समाजाचे मतदान हे महाविकास आघाडीसाठी जमेचे ठरणार आहे. एकप्रकारे आंबेडकरी चळवळ आणि मुस्लीम समाजाच्या एक गठ्ठा मतांपासून भाजप यंदा ‘वंचित’ होऊ शकतो. त्यात २००९ नंतर भाजपने सलग हा विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे.

मात्र विद्यमान आमदार सुनील कांबळे हे केवळ ५ हजार १२ मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.मात्र या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47 हजार 148 मते मिळाली होती. आता राजकीय स्थिती बदलेली आहे आणि त्यावरून मतदारांच्या भावना संतप्त आहे. त्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे काटेकोरपणे नियोजन त्यांनी केले आहे. माजी नगरसेवक अविनाश बागवे हेही मोदी सरकारच्या योजनांचा पंचनामा करत आहे.त्यात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हेही याच मतदारसंघातील असून त्यांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा याच मतदारसंघात पार पडली आणि या सभेने संपूर्ण चित्र पालटले आहे. राहुल गांधी यांच्या सभेने मतदारांवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसला प्राबल्य मिळणार आहे. सद्यस्थितीत इंडिया फ्रंटमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ( उबाठा )आप व सर्व घटक पक्षांची बांधलेली मोट काँग्रेसच्या मतांचे समीकरण दृढ करेल असा ठाम विश्वास राजकीय अभ्यासकांचा आहे. प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ संमिश्र आहे. कष्टकरी वर्गाचे मोठे प्रमाण आहे. वाढती महागाई हाच मुद्दा महायुतीला गारद करणार आहे.

या मतदारसंघात स्व. गिरीश बापट यांना १२७३३ मतांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करत बालेकिल्ला ही ओळख भाजपने जशी गमावली आहे.
तशी भाजपमधील अंतर्गत दुफळीमुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात लोकसभाच काय आगामी विधानसभा मतदारसंघाचे चित्र महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या विभाजनाचा सर्वाधिक फटका हा या मतदारसंघात भाजपला बसणार आहे. त्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय महत्वाकांक्षा हे प्रमुख कारण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी – कार्यकर्ते मनापासून सहभाग देतील का ? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपची या मतदारसंघावर पकड आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला सहज खेचून आणता येईल.यासाठी हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.