Bhide Bridge Pune | भिडे पुल पुन्हा वाहतुकीसाठी बंद राहणार! | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार 

Homeadministrative

Bhide Bridge Pune | भिडे पुल पुन्हा वाहतुकीसाठी बंद राहणार! | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार 

Ganesh Kumar Mule Sep 09, 2025 7:15 PM

Signature campaign | राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम
Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents
Buying gold on Dhanteras |  धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा | फसवणूक होणार नाही

Bhide Bridge Pune | भिडे पुल पुन्हा वाहतुकीसाठी बंद राहणार! | नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – भिडे पुल पुन्हा एकदा वाहतुकीसाठीबंद राहणार आहे. ९ सप्टेंबर रात्री १२ वाजले पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान हा पूल किती दिवस बंद असणार आहे, याची माहिती मात्र पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आलेली नाही. (Pune Bhide Bridge News)

 

वनाझ ते रामवाडी या मार्गीकीतील छत्रपती संभाजी उद्यान व डेक्कन जिमखाना या मेट्रोस्थानकांना पुण्याच्या मध्यवर्ती पेठ भागाशी जोडण्याकरिता पादचारी फुल बांधण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पूलाचे नुकतेच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले असून हा पूल मेट्रो प्रवासी आणि नागरिकांसाठी खुला झाला आहे. तर डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे सुरु असणारे काम गणेशोत्सवादरम्यान भिडे पूल नागरिकांसाठी खुला करून प्रवाश्यांच्या सोयीसाठी थांबवण्यात आले होते.

डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल हा मुळा नदीवरील भिडे पूल या पुलाच्या वर बांधण्यात येत आहे. या पादचारी पूलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, आणि लक्ष्मी रस्ता येथील नागरिकांना व या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे अतिशय सोपे होणार आहे. या पादचारी पुलाचे काम उद्या बुधवार,  १० सप्टेंबर पासून परत सुरू करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भिडे पूल हा आज मंगळवार, ९ सप्टेंबर  रोजी रात्री १२ वाजेपासून (बुधवार पहाटेचे १२ वाजेपासून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदी पात्रातील रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असेल. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल व झेड ब्रिज या पूलांचा वापर वापर करून मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे मेट्रो तर्फे करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम पुणे मेट्रो तर्फे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तरी तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. असे आवाहन पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: