PMC Ward 10 – Bavdhan Bhusari Colony | प्रभाग क्रमांक – १० –  बावधन भुसारी कॉलनी | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि सर्व काही सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 10 – Bavdhan Bhusari Colony | प्रभाग क्रमांक – १० –  बावधन भुसारी कॉलनी | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि सर्व काही सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Aug 30, 2025 9:44 AM

Traffic problems in Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Arogyavardhini centers | समाविष्ट गावासहित पुण्यात आणखी होणार 125 आरोग्यवर्धिनी केंद्र 
Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

PMC Ward 10 – Bavdhan Bhusari Colony | प्रभाग क्रमांक – १० –  बावधन भुसारी कॉलनी | प्रभागाची व्याप्ती, हद्दी आणि सर्व काही सविस्तर जाणून घ्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग १० हा बावधन भुसारी कॉलनी असा आहे. चांदणी चौक, गुरु गणेश नगर, एकलव्य कॉलेज असे विविध भाग या प्रभागात येतात. या प्रभागाची व्याप्ती आणि हद्दी सविस्तर जाणून घेऊयात.  (Pune PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – १० –  बावधन भुसारी कॉलनी

लोकसंख्या एकूण – ८४१२७ – अ. जा. – ७२९४ – अ. ज. ७८४

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

 

व्याप्ती: एक्झॉटीका सोसायटी, प्लॅनेट नाईन बिस्ट्रो, स्काय एरिस सोसायटी, मोकाई वस्ती, साई वेलोसिटी, करण सनकोस्ट, प्रांजली पाटील नगर, बावधन, भुसारी कॉलनी, शिंदे नगर, रामनगर, माणिक्य नगर, गुरुगणेश नगर, एकलव्य कॉलेज, शास्त्री नगर (पार्ट), सागर कॉलनी, महात्मा सोसायटी, चांदणी चौक, वेद भवन, जिजाई नगर, प्रथमेश सोसायटी, इंदिरा शंकर नगरी इ.

उत्तर: मौजे सुस, मौजे लवळे व मौजे बावधन बुद्रुक यांची हद्द एकमेकास जेथे मिळते तेथून पूर्वेस मौजे सुस व मौजे बावधन बुद्रुक यांच्या हद्दीने व पुढे मौजे बावधन खुर्द व पुढे पूर्वेस मौजे बावधन खुर्द व मौजे सुतारवाडी यामधील हद्दीने व पुढे कोथरूड-पाषाणच्या हद्दीने जुन्या मनपा हद्दीस मिळेपर्यंत.

पुर्वः मौजे कोथरुड व मौजे पाषाणची हद्द जेथे जुन्या मनपा हद्दीस मिळते तेथून दक्षिणेस जुन्या मनपा हद्दीने व पुढे वनाज मेट्रो डेपोच्या पश्चिमेकडील हद्दीने (कोथरूड कचरा डेपो) पौड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पौड रोडने पूर्वेस नानासाहेब धर्माधिकारी पथास कोथरूड पोलीस स्टेशन जवळ आनाभाऊ साठे चौकात मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस नानासाहेब धर्माधिकारी पथाने कोथरुड डी. पी. रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस कोथरुड डी.पी. रस्त्याने कै. बिरुजी मोकाटे चौकामध्ये श्रीकांत ठाकरे पथास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेकडे श्रीकांत ठाकरे पथाने व पुढे श्रीकांत ठाकरे पथाच्या सरळ रेषेने गोपीनाथ नगर जवळ मौजे वारजे व मौजे कोथरुडच्या हद्दीस मिळेपर्यंत.

दक्षिण: श्रीकांत ठाकरे पथाची सरळ रेषा गोपीनाथ नगर जवळ मौजे वारजे व मौजे कोथरूडच्या हद्दीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस मौजे वारजे व कोथरूडच्या हद्दीने मौजे बावधन खुर्द व मौजे वारजेच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस मौजे बावधन खुर्दच्या व मौजे वारजे यामधील हद्दीने मौजे बावधन खुर्द व मौजे भूगावच्या हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः मौजे बावधन खुर्द व मौजे वारजे यामधील हद्द जेथे मौजे भूगावच्या हद्दीस मिळते तेथून उत्तरेस मौजे भूगाव, मौजे बावधान खुर्द यांच्या हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे बावधन बुद्रुक व मौजे लवळेच्या हद्दीने मौजे सुसच्या हद्दीस (मनपा हद्दीस) मिळेपर्यंत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: