डिसले गुरुजींची प्रलंबित रजा मंजुर
: शिक्षणमंत्र्यांनी सीईओंना दिले निर्देश
मुंबई : जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक ग्लोबल टीचर पुरस्कार सन्मानित रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे सतत चर्चेत असतात. त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते त्याकरीता त्यांनी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात मागील महिन्यात २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला होता मात्र अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली होती, यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. अध्ययनासाठी मागितलेली त्यांची रजा प्रलंबित ठेवल्याने सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीचे सूर उमटलेले दिसून आले. आता मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयात पुढाकार घेत डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा केलाय. शिक्षणमंत्र्यांनी सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिलेत. खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हि माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली.
सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी अमेरिकेत जाऊन PH.D करण्याकरीता जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात ध्ययन रजेचा अर्ज दिला होता. यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची डिसले यांनी भेट घेतली होती मात्र यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डिसलेंना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना भेटण्यास सांगितले. जेव्हा डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा अध्ययन रजेची परवानगी नाकारत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक असल्याचे सांगत तुम्ही जर अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेलात तर शाळेचे काय होणार; असा प्रश्न उपस्थित केला होता सोबत एवढी प्रदीर्घ रजा देणे शक्य नाही असे स्पष्ट सांगत तुम्हीच यावर उपाय शोधा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी रणजितसिंह डीसले जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे नियुक्तीच्या ठिकाणी ३ वर्ष गैरहजर होते असा आरोप करीत त्यांनी त्या कालावधीतील पगार सुद्धा घेतला.सोबत एखादा कर्मचारी जेव्हा देश सोडून जातो, तेव्हा त्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते मात्र कुणालाही कल्पना न देता डिसले गैरहजर राहिलेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 22, 2022
COMMENTS