Chhatrapati Shivaji Maharaj Nagar : शिवाजीनगरचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ होणार : मात्र ही असेल अट 

HomeBreaking Newsपुणे

Chhatrapati Shivaji Maharaj Nagar : शिवाजीनगरचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ होणार : मात्र ही असेल अट 

Ganesh Kumar Mule Jan 22, 2022 8:25 AM

organic farm produce | सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिका ओटे उपलब्ध करून देणार 
Water Cut : गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Property Tax : PMC : पुणेकरांवर कर वाढीचा बोजा नाही

शिवाजीनगरचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ होणार

: मात्र ही असेल अट

पुणे : शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर भागाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज नगर करण्याचा प्रस्ताव नाव समिती पुढे ठेवण्यात आला होता. समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र याला मुख्य सभे मार्फत राज्य आणि केंद्र सरकारची मंजूरी घ्यावी लागेल. अशी अट ठेवण्यात आली आहे.

: केंद्र आणि राज्याची मान्यता आवश्यक

नाव समितीचे धोरणा नुसार आमदार  सिद्धार्थ शिरोळे, सभासद ज्योत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे, स्वाती लोखंडे यांनी त्यांचे प्रभागातील शिवाजीनगर या भागाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी पुणे शहरातील प्रसिद्ध असे शिवाजीनगरचा नाम विस्तार लवकरात लवकर “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा, याबाबतचा प्रस्ताव मा.महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर केलेला होता. त्याबाबत अभिप्राय मागविण्यात आलेला आहे. त्यानुसार  वाहतुक नियोजन विभागा मार्फत रस्ते, चौक, उड्डाणपुल, भुयारी मार्ग व वाहनतळे यांचे नामकरणाचे प्रस्ताव नाव समितीकडे सादर करणेत येतात. एखाद्या पेठेचे किंवा परिसराचे नामविस्तार करावयाचे असल्यास त्याचे अधिकारा बाबत मुख्य विधी अधिकारी यांचा कायदेशीर बाबी अभिप्राय घेवून प्रकरण फेर सादर करण्या बाबत कळविण्यात आलेले आहे.  विधी विभागाकडून अभिप्राय घेण्यात आला असुन, पुणे शहरातील कोणत्याही इमारती, दवाखाने, बगिचे इ.चे नामकरण किंवा नामविस्तार करणे बाबत प्रकरण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३० नुसार महानगरपालिकेचे स्थापित विशेष समित्यांपैकी नाम समिती मार्फत मान्यतेस्तव मुख्य सभेकडे पाठविणे आवश्यक आहे, असे विधी विभागाचे मत आहे याबाबत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा मधिल प्रकरण ११ मधिल दोनः रस्त्यांना नावे किंवा क्रमांक देणे आणि [जागांना] क्रमांक देणे मधिल अ.क्र. १ (अ) नुसार आयुक्त्यास महानगरपालिकेच्या मंजुरीने, महानगरपालिके मध्ये निहित असलेला कोणताही रस्ता किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाण ज्या नावाने किंवा ज्या क्रमांकाने ओळखण्यात येईल ते नाव किंवा तो क्रमांक ठरविता येईल, याबाबत नमुद करण्यात आलेले आहे. तथापि या मध्ये पेठ/नगर चे नाम विस्तारा बाबत माहिती नमुद नाही. सदर नाम विस्तार संबधाने राज्य शासनाचे विविध विभागाच्या रेकॉर्डवर परिणाम होणार असल्याने (उदा- रेल्वे, पोस्ट व सर्व्हे ऑफ इंडिया, इ) नाम विस्तारा बाबत या विभागांचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे. सदर विषय हा नाम विस्तार अंतिम मान्यतेचा विषय केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित येत आहे. तरी मुख्य सभेच्या मान्यते नंतर प्रकरणी आवश्यक ती  प्रशासकीय मान्यते बाबतची कार्यवाही करणार, या अटीवर- शिवाजीनगरचा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज नगर”,असा करण्यात यावा. असा प्रस्ताव नाव समिती मार्फत मान्य करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0