Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा

Homeadministrative

Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा

Ganesh Kumar Mule Feb 02, 2025 10:13 PM

Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन
PDEA | ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Reading Inspiration Day | पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे  | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 

Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात “भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा

 

Pune Education News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर ,येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने “भाषा संवर्धन पंधरवडा” दि.१४जाने. ते २८ जानेवारी दरम्यान साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे व डॉ. वसंत गावडे, ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे यांनी दिली. (Pune News)

त्यामध्ये सामूहिक ग्रंथ वाचन, पुस्तक परीक्षण, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी, ‘मराठी भाषा संवर्धन’या विषयावर व्याख्यान इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. तसेच निबंध, घोषवाक्य लेखन , काव्यवाचन व काव्य लेखन, कथा अभिवाचन,प्रश्नमंजुषा, सुंदर हस्ताक्षर, महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.राजेंद्र अंबवणे मराठी भाषेचे संवर्धन या विषयावर बोलताना म्हणाले,”आपण आपल्या मातृभाषेचे जतन केले पाहिजे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे” या उपक्रमाची सांगता ग्रंथदिंडीने करण्यात आली.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे: निबंध लेखन-साक्षी तळपे(प्रथम) अर्चना गवारी(द्वितीय) भले पायल (तृतीय),काव्य लेखन -तनुजा घोलप (प्रथम)सुप्रिया वरे(द्वितीय) युवरानी सोनवणे(तृतीय), काव्यवाचन-प्रणव माळवे (प्रथम)प्रथमेश घोलप (द्वितीय) रोंगटे स्नेहल(तृतीय), हस्ताक्षर- साहिल हांडे ( प्रथम) अजय जाधव(द्वितीय), माधुरी मोरे(तृतीय), कथा अभिवाचन-अभिषेक चौधरी,(प्रथम), क्षितिज शिंगोटे (द्वितीय), रोहित पाथरट (तृतीय), घोषवाक्य-अन्सारी साहेबा अफसर (द्वितीय), विद्या गोंदे (तृतीय) अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी नंबर मिळविले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भव्य अशा ग्रंथदिंडी मध्ये आपला सहभाग नोंदविला.

सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.डी.सोनावणे, उपप्राचार्य डॉ.रमेश शिरसाट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अमृत बनसोडे यांचे सहकार्य लाभले, सदर स्पर्धांचे परीक्षण डॉ. छाया तांबे व डॉ. रोहिणी मदने यांनी केले. डॉ.विनायक कुंडलिक व डॉ. सुनील लंगडे, निखिल काकडे, राजेंद्र शेळके यांनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0