Pune PMC News | शालेय स्वछता साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवल्याचा आरोप | निविदा तत्काळ रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 

Homeadministrative

Pune PMC News | शालेय स्वछता साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवल्याचा आरोप | निविदा तत्काळ रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 

Ganesh Kumar Mule Feb 03, 2025 8:00 PM

Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार
DA hike : Good News  | केंद्रीय कर्मचार्‍यांची प्रतीक्षा संपली  |  महागाई भत्त्यावरील महत्त्वपूर्ण अपडेट
Light | Susgaon | सुसगावातील महादेव नगरमध्ये अखेर लागले ‘दिवे’!

Pune PMC News | शालेय स्वछता साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवल्याचा आरोप | निविदा तत्काळ रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

 

Tushar Patil BJP – (The Karbhari News Service) – वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण विभागासाठी शालेय स्वछता साहित्य खरेदी करणे या कामी निविदा (Tender) मागवण्यात आली आहे. मात्र विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन मध्यवर्ती भांडार विभागाने (Central Store Department) अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांची पूर्व मान्यता न घेता चुकीचे अटी व शर्ती व मोघम स्पेसीफीकेशन (Specification) समाविष्ठ केले आहे. असा आरोप पुणे शहर भाजपचे उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil Pune BJP) यांनी केला आहे. तसेच ही निविदा तातडीने रद्द करण्याची आणि नव्याने निविदा प्रक्रिया लावण्याची मागणी पाटील यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पाटील यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२४-२५ करिता शालेय स्वछता साहित्य खरेदी करणे या कामी मान्यता न घेता चुकीचे अटी व शर्ती व मोगम स्पेसीफीकेशन समाविष्ठ केले असून म्हणजेच IS Standard चे नसून निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदेचा अंतिम कालावधी हा उद्या म्हणजे ४ फेब्रुवारी १२ वाजता आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. (PMC Education Department)

ही निविदा प्रसिद्ध करताना मध्यवर्ती भांडार कार्यालयाने अति आयुक्त, आयुक्त यांची मान्यता न घेता विशिष्ट लोकांना डोळ्यासमोर ठेऊन अटी व शर्ती समाविष्ट केल्या आहे, असा आरोप करत पाटील यांनी त्याचा विविध ९ मुद्दयामध्ये तपशील देखील दिलेला आहे.

पाटील यांनी पुढे आपल्या निवेदनात म्हट्ले आहे कि, निविदेतील पान 2 अट क्र 12 मध्ये शासकीय / निमशासकीय संस्था यापैकी कोणालाही निविदेत नमूद साहित्य 30% परिमाण पुरवठा केल्याचा अनुभव दाखला निविदेसोबत जोडणे बंधनकारक राहील; परंतु महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयीन  परीपत्रकानुसार निविदाधारकाने मागील ०५ वर्षांत निविदेमध्ये नमूद साहित्य जास्त परीमाणाच्या (किमान तीन जास्तीत जास्त पाच) ३०% पुरवठा शासकीय / निमशासकीय संस्थायांना केल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. अशी अट असून संबंधीत ठेकेदारानी स्वतच्या फायदेसाठी अधिकारी यांच्यावर दबाव आणून सदर चुकीचे अट टाकण्यात आलेली आहे. असे निदर्शनास येते. असे पाटील यांनी म्हटले आहे.

निविदेमध्ये नमूद केलेले स्पेसिफिकेशन स्पष्ट काय हवे हे नमूद नसून तसेच भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणे देखील नसून मोगम लिहण्यात आले आहे या बाबत भारतीय मानक ब्युरो (BIS) यांचे IS Standard असलेले स्पेसीफिकेशन घेण्यात येऊन निविदा मध्ये सुधारित स्पेसिफिकेशन समाविष्ठ करण्यात यावे. तसेच अटी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयीन परिपत्रक नुसार आयुक्त , अति आयुक्त यांची पूर्व मान्यता न घेता तसेच सदर अटी कुठेही नमूद नसून कशाचे आधारे टाकण्यात आल्या, याचा खुलासा खात्यामार्फत घेण्यात यावा. तसेच आमच्या मागणीची गंभीरपणे दखल घेण्यात येऊन त्यामध्ये बदल करून सुधारित अटी व शर्ती नुसार नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश खातेप्रमुख यांना देण्यात यावा. तसेच आमच्या पत्राच्या लेखी खुलासा निविदा उघडण्यापूर्वी देण्यात यावा व तो पर्यंत निविदा प्रकिया तात्काळ स्थगित करण्यात यावी. अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसे न झाल्यास कोर्ट मार्फत दाद मागण्यात येइल. असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0