PMC Employees Union | पुणे महानगरपालिकेतील या २०१२ बॅचचा स्नेहमेळावा उत्सवात संपन्न!

Homeadministrative

PMC Employees Union | पुणे महानगरपालिकेतील या २०१२ बॅचचा स्नेहमेळावा उत्सवात संपन्न!

Ganesh Kumar Mule Feb 02, 2025 9:59 PM

PMC Retired Employees | अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांच्यासहित महापालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त!
PMC Statue Structural Audit | पुणे महापालिका आपल्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट! | महापालिका भवन रचना विभागाची माहिती
Women self Defence Master Trainer | मास्टर ट्रेनर चे मानधन होणार दुप्पट | स्थायी समितीची मान्यता 

PMC Employees Union | पुणे महानगरपालिकेतील या २०१२ बॅचचा स्नेहमेळावा उत्सवात संपन्न!

 

Pune PMC Emplooyees – (The Karbhari News Service) – गणेश जयंतीचा योग साधत पुणे महानगरपालिकेतील सन २०१२ या बॅच चे १ ले स्नेह संमेलन हॉटेल व्हाईट हाऊस औंध पुणे या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडले. कार्यक्रमाची सुरवात अध्यक्ष बजरंग पोखरकर यांच्या शुभ हस्ते गणेशाचे पुजन करून करण्यात आली, सुंदर अशी गणेश वंदना उर्मिला गिते मॅडम यांनी सादर केली. (Pune PMC News)

या निमित्ताने  पी एम सी एम्प्लॉइज युनियन चे अध्यक्ष  बजरंग पोखरकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

त्याच बरोबर पी एच डी करीत असलेले जिजाभाऊ दातीर, नवनिर्वाचित सहा क्रीडा अधिकारी  सोनाली कदम , सोमनाथ गोरे यांचा सत्कार २०१२ बॅच च्या वतीने करण्यात आला. या स्नेह संमेलनाला मोठ्या संख्येने सेवक उपस्थित होते.

या सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे १३ वर्षानंतर विविध जिल्ह्यातून तालुक्यातून २०१२ साली पुणे मनपा मधे कामाला लागलेले सर्व सेवक एकत्र येऊन एकमेकांचे सुख दुःख, कामातील येणाऱ्या अडचणी त्यांच्या जीवनातील महत्वाचे क्षण, आज पर्यंत झालेला प्रवास यावर हसत खेळत गप्पा मारल्या, गणेश जयंती असल्यामुळे विशेष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार करण्यात आला, महिलांनी विविध स्पर्धे मधे सहभागी होऊन बक्षीस मिळवली, ३ लकी ड्रॉ विजेताना विशेष बक्षीस देण्यात आले. अनेकांनी आपल्या भावना, आलेले अनुभव मनमोकळेपणाने सांगितल्या असच सर्वांनी हसत खेळत आनंदात जगाव दुसऱ्यांची मदत करावी.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बजरंग पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली किशोर भाडले,अजित गाराळे , सुनील मधे, गीते मॅडम, छाया सूर्यवंशी, समीर कळप,सुवर्णा मोरे,प्रिरंग,राजू ढाकणे, भाऊ पाटील, दिपक घोडके, सुभाष थोरात,अविनाश गायगवली यांनी केले. सूत्रसंचालन- सशी निरवणे यांनी केले,


सेवक काम करत असताना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही दबावाखाली काम करत असतो त्यांना अनेक बंधने असतात ते काम करताना त्यांच्या मधला आत्मविश्वास वाढवीने गरजेचे आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी असे कार्यक्रम घेणे गरजेचे एक एकमेकांच्या स्वभावाची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही युनियनच्या माध्यमातून कार्यक्रम घेतच असतो परंतु बॅच चा कार्यक्रम हा आगळा वेगळाच असतो त्या मुळे सर्वांनी वर्षांतून एकदा तरी असे स्नेहमेळावे घेणे गरजेचे आहे.

| बजरंग पोखरकर – अध्यक्ष युनियन

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0