Ali Daruwala | पतित पावन संघटनेच्या महाराष्ट्र प्रांत प्रवक्तापदी अली दारुवाला
Patit Pavan Sanghatana – (The Karbhari News Service) – पतित पावन संघटनेच्या महाराष्ट्र प्रांत प्रवक्ता पदी अली दारुवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील बोट क्लब येथे पतित पावन संघटनेचे प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के यांच्या आदेशाने दारुवाला यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रांत संपर्कप्रमुख राजेश मोटे, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पुणे शहर पालक मनोज नायर, पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार आदी उपस्थित होते. (Pune News)
यावेळी बोलताना अली दारुवाला म्हणाले, ” आज समाजात सर्व सामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातून त्यांना न्याय मिळत नसल्याचे नेहमीच निदर्शनात आले आहे. त्यातच मुख्यता लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद सारखे प्रश्न ऐरणीवर आहेत. यावर संघटनेच्या वतीने जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. शासनाकडे यासंदर्भात पाठपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र जर शासनाने याकडे लक्ष नाही दिले तर मग पतित पावन संघटना त्यांच्या स्टाईलने आंदोलन करेल “.
पुढे बोलताना दारुवाला म्हणाले, “आज समाजात जातीयवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्याला आळा घालणे गरजेचे आहे. देशाचे भविष्य म्हणजेच आपली युवा पिढी व्यसनाच्या आधीन होतं चालली आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेर घर म्हणले जायचे आता हेच पुणे व्यसनाचे माहेर घर बनण्याच्या मार्गांवर आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे. आज गोहत्येचे प्रमाण वाढले आहे त्यावर आम्ही कठोर ती कारवाई करू. ”
नितीन सोनटक्के म्हणाले, ” अली दारुवाला यांचे एकंदरीत काम पाहता आजच्या समाजाला अशा माणसांची गरज आहे. आज वर पतित पावन संघटनेत प्रवक्ता हे पद नव्हते, मात्र दारुवाला यांचे वक्तृत्व कौशल्य पाहून त्यांना हे पद देण्यात आले आहे. दारुवाला नक्कीच या पदाला योग्य ते न्याय देतील. ”
——-
Ali Daruwala Appointed as Maharashtra State Spokesperson of Patit Pavan Sanghatana*
Ali Daruwala has been appointed as the Maharashtra State Spokesperson of Patit Pavan Sanghatana. On February 7, at Boat Club in Pune, Daruwala was handed his appointment letter under the orders of Patit Pavan Sanghatana’s State General Secretary, Nitin Sonatakke. Present at the event were State Vice President Balasaheb Bhamre, State Coordination Head Rajesh Mote, Pune City President Shrikant Shilimkar, Pune City Guardian Manoj Nair, and Pune City Working President Gokul Shelar, among others.
Speaking on the occasion, Ali Daruwala said, “Today, the common people in our society are facing numerous issues, and they are not getting justice. Among these, topics like Love Jihad, Land Jihad, and Vote Jihad are at the forefront. The organization will focus on these issues and will push the government to take necessary action. However, if the government does not pay attention, then Patit Pavan Sanghatana will protest in its own style.”
Further, Daruwala added, “Caste-based discrimination is increasing in society, and it needs to be curbed. The future of our nation—our youth—is falling prey to addiction. Pune was once known as the hub of education, but now it is on the path to becoming a hub of addiction, which must be stopped. Additionally, the rising incidents of cow slaughter will be met with strict action.”
State General Secretary Nitin Sonatakke stated, “Considering Ali Daruwala’s work, it is evident that society today needs such individuals. Until now, Patit Pavan Sanghatana did not have a spokesperson position, but recognizing Daruwala’s oratory skills, we have given him this responsibility. We are confident that he will do justice to this role.”
COMMENTS