Illegal Cab, Bikes : अनधिकृत बाईक (दुचाकी), टॅक्सी वर होणार कारवाई!  RTO चा इशारा 

HomeBreaking Newsपुणे

Illegal Cab, Bikes : अनधिकृत बाईक (दुचाकी), टॅक्सी वर होणार कारवाई! RTO चा इशारा 

Ganesh Kumar Mule Dec 18, 2021 8:00 AM

MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निकाली 
PM Modi | प्रधानमंत्री मोदी जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ३० मे ला साधणार ऑनलाइन संवाद
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

अनधिकृत बाईक (दुचाकी), टॅक्सी सेवा त्वरीत बंद करावी; अन्यथा कायदेशीर कारवाई

RTO चा इशारा

पुणे : अनधिकृत व बेकायदेशीर रित्या सुरु असणारी बाईक (दुचाकी), टॅक्सी सेवा त्वरीत बंद करावी, यापुढे अशी सेवा सुरू असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांनी कळविले आहे.

दुचाकी/टॅक्सी खाजगी संवर्गात नोंद झालेली वाहने भाडे तत्वावर वापरल्यास परवाना शर्तीचे तसेच नोंदणी नियमांचे उल्लंघन होते. अशा सेवेचा लाभ घेताना संबंधीत प्रवाशांस कोणतेही लाभ (अपघातानंतर विमा संरक्षण) मिळणार नाही. सदर कंपन्या अनधिकृतपणे केवळ ऑनलाइन संकेतस्थळ किंवा ॲपच्या आधारे कंपनी चालवित आहेत. अशी सेवा पुरवणारे चालक विना हेल्मेट प्रवास करत असून वाहतूक नियम व रस्ता सुरक्षिततेला ही बाब धरून नाही.

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वापरात येणारी वाहने भाडोत्री परिवहन संवर्गात नोंद असणे आवश्यक आहे. कंपनी नोंद करताना विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर सदर व्यवसाय सुरू करता येतो.

जीव धोक्यात घालून सदर कंपनाच्या वेबसाइट तसेच ॲपद्वारे अनधिकृत व बेकायदेशीररित्या पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेऊ नये. तसेच आपली दुचाकी वाहने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या या सेवेकरिता उपलब्ध करून देऊ नये. मोटार वाहन कायदा कलम ६६ / ९९२अ प्रमाणे विना परवाना प्रवाशांची वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येईल असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कळविले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0