मनसेचा वर्धापनदिन पुण्यात होणार साजरा
: राज ठाकरेंची तोफ धडाडणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष
मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
असा असेल राज ठाकरेंचा पुणे दौरा
९ मार्च – सकाळी ११ वाजताची वेळ भेटीगाठीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत यंदा १६ वा वर्धापनदिन शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे.
१० मार्च – सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
COMMENTS