Pune City | पुणे आता शांत राहिले नाही | १० पैकी ९ नागरिक म्हणतात पुण्याचे पर्यावरण चांगले नाही!

Homeadministrative

Pune City | पुणे आता शांत राहिले नाही | १० पैकी ९ नागरिक म्हणतात पुण्याचे पर्यावरण चांगले नाही!

Ganesh Kumar Mule Jul 30, 2026 8:31 AM

PMC Employees promotion | महापालिकेच्या ७२ कर्मचाऱ्यांची शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर पदोन्नती!
Stall on ST Bus Stand | आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
PMC SEED Project | पुणे महानगरपालिका राबवणार SEED प्रकल्प!|विना निविदा  सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास मान्यता 

Pune City | पुणे आता शांत राहिले नाही | १० पैकी ९ नागरिक म्हणतात पुण्याचे पर्यावरण चांगले नाही!

| वर्षभर ध्वनीची असते उच्च पातळी

| महापालिकेच्या पर्यावरण अहवाल 2025-26 मधून नागरिकांच्या नाराजीचा सूर

 

Pune News – (The Karbhari News Service) – कधी ‘पुणेरी संस्कृती’, ‘राहण्यायोग्य शहर’ आणि ‘शांतता’ यासाठी ओळखले जाणारे पुणे आता तसे राहिलेले नाही. पुणे महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2025-2026’ मध्ये समोर आलेल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. अहवालानुसार 10 पैकी 9 नागरिकांचे म्हणणे आहे की पुण्याचे पर्यावरण चांगले नाही. (PMC ESR 2025-26)

अहवालात नागरिकांना पुण्याच्या पर्यावरणाबत मत विचारण्यात आले होते. यामध्ये केवळ 10 टक्के प्रतिसादकर्त्यांनी पुण्याच्या पर्यावरणाला ‘चांगले’ किंवा ‘अतिशय चांगले’ अशी श्रेणी दिली. उलट, जवळपास 79 टक्के नागरिकांनी पर्यावरण ‘वाईट’ किंवा ‘खूप वाईट’ असल्याचे स्पष्ट मत नोंदवले. तसेच सुमारे 12 टक्के प्रतिसादकर्त्यांनी पर्यावरणाला ‘भयावह’ असे मूल्यांकन दिले.

याचा अर्थ, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे 10 नागरिकांपैकी 9 नागरिकांच्या मते पुण्याच्या पर्यावरणाची गुणवत्ता समाधानकारक नाही.

ध्वनीप्रदूषण आणि कचरा हा प्रमुख मुद्दा
नागरिकांच्या दृष्टीने प्राधान्याचा प्रश्न असा होता की, महापालिकेने सर्वात आधी कोणत्या पर्यावरणीय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे. यावर सर्वाधिक 31 टक्के प्रतिसादकर्त्यांनी ‘घनकचरा आणि शहराचे कचरा व्यवस्थापन’ हा पर्याय निवडला. त्यानंतर फुटपाथ व रस्त्यांचे व्यवस्थापन सुधारणा 19 टक्के, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे 18 टक्के, वायुप्रदूषण कमी करणे 12 टक्के, नदी पुनरुज्जीवन 10 टक्के, अधिक वृक्षे लावणे आणि हरित क्षेत्र वाढवणे 8 टक्के, जलस्रोत 7 टक्के आणि पूर व्यवस्थापन 9 टक्के यांचा समावेश आहे.

नागरिकांनी सुनावणीमध्ये तळे वाचणे, वायू प्रदूषण, वाढते तापमान, पाण्याचे प्रमाण आणि स्वच्छतेबाबतही समस्या मांडल्या आहेत.

वर्षभर ध्वनीची उच्च पातळी 
अहवालात ध्वनीप्रदूषणाबतही धक्कादायक माहिती आहे. वर्षभरातील 22 निरीक्षण केंद्रांवरील आणि तीन वैधानिक क्षेत्रांतील ध्वनिपातळीचे विश्लेषण दर्शवते की, पुण्यातील ध्वनीप्रदूषण हे एखाद्या विशिष्ट प्रसंगापुरते मर्यादित नसून ते शहराच्या ध्वनिपर्यावरणाचे संरचनात्मक वैशिष्ट्य बनले आहे.

आंबेडकर चौक, ब्रेमेन चौक यांसारख्या व्यापारी क्षेत्रांमध्येही 65 डेसिबलची मर्यादा असूनही ध्वनिपातळी बहुतांश वेळा जास्तच राहते. शाळा आणि रुग्णालयांसारख्या ‘सायलन्स झोन’ मध्ये 50 डेसिबलची मर्यादा असताना, नू.म.वि. शाळा आणि पूना हॉस्पिटल परिसरात वर्षभर ध्वनिपातळी अनेकदा 60 ते 72 डेसिबल दरम्यान नोंदविण्यात आली आहे.

रामोशी गेट चौकी आणि एरंडवणे परिसरातील निवासी भागातही वर्षभर ध्वनिपातळी 60 डेसिबलच्या वर राहिल्याचे, तर गर्दीच्या काळात ती 75 डेसिबलपेक्षाही अधिक झाल्याचे आढळते.

हवेची गुणवत्ता, हिरवा क्षेत्र, पाणीपुरवठा किंवा इतर पर्यावरणीय निर्देशांकांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसत असली, तरी नागरिकांच्या दैनंदिन अनुभवापेक्षा ते प्रतिबिंब पुरेसे नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. तांत्रिक निर्देशक आणि नागरिकांचा अनुभव यातील ही तफावत एक महत्त्वपूर्ण निरीक्षण असून, महापालिकेने तिचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: