Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन

Homeadministrative

Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

Ganesh Kumar Mule Sep 28, 2026 7:45 PM

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 
Pavneet Kaur IAS | मान्सून कमकुवत | सामान्य पाऊस फक्त १४% | पुणे महापालिकेचा पाणी बचतीचा ‘अॅक्शन प्लॅन’!
EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

 

Pune Water Crisis – (The Karbhari News Service) – यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात मान्सूनने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली असताना, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत मात्र दिलासादायक परिस्थिती आहे. शहराच्या चारही धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी खडकवासला प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन (शुक्रवार, २५ सप्टेंबर) पासून नियोजित वेळेपूर्वीच सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. (Pune News)

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या परवानगीने आणि आदेशानुसार हे आवर्तन सोडण्यात येत आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात सापडली असून त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. हे आवर्तन ४५ दिवस चालणार आहे.

४ टीएमसी पाणी शेतीला, पुणेकर चिंतेत

या आवर्तनामुळे धरणातील जवळपास ४ टीएमसी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात यंदा चांगला पाऊस झाला असला तरी राज्यातील एकूणच पावसाची तूट आणि आगामी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. फेब्रुवारी ते मे या काळात शहराला पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक गरज असते. अशा वेळी आताच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांवर संपूर्ण शहर अवलंबून आहे. आताच पाणी राखून ठेवणे आवश्यक असताना ते शेतीला सोडणे योग्य आहे का, असा सवाल पुणेकर उपस्थित करत आहेत.

दरम्यान, शेतकरी वर्गाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून, वेळेत पाणी मिळाल्याने रब्बीची पिके वाचतील, अशी भावना व्यक्त केली आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक असताना आता जलसंपदा विभाग पिण्याच्या पाणी आणि शेतीच्या पाण्याचा समतोल कसा राखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0