CEC Gyanesh Kumar | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करा; राष्ट्रपतींनी कारवाई करावी – मोहनदादा जोशी यांची मागणी

HomeBreaking News

CEC Gyanesh Kumar | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करा; राष्ट्रपतींनी कारवाई करावी – मोहनदादा जोशी यांची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 28, 2026 6:49 PM

Loksabha | Vidhansabha Election | लोकसभा, विधानसभा निवडणूक हालचालींना वेग | निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आले हे आदेश
ECI | RVM | घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान |निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत
Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी

CEC Gyanesh Kumar | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करा; राष्ट्रपतींनी कारवाई करावी – मोहनदादा जोशी यांची मागणी

 

Mohan Joshi Congress – (The Karbhari News service) – “देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदयांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत,” अशी ठाम मागणी माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी केली आहे.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. ( Pune Congress Agitation)

यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना मोहनदादा जोशी म्हणाले, “लोकशाहीमध्ये मतदाराचा मताधिकार आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. या प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.”१४ वेळा हरकती नोंदवल्याचा दावाकाँग्रेसच्या निवेदनानुसार, निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा औपचारिक हरकती नोंदवल्या आहेत. या हरकती मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, Form-6 मधील बदल आणि मतदार यादीच्या डेटाबेसच्या व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित होत्या.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्वायत्तता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.”लोकशाही कोणत्याही व्यक्तीची किंवा सत्तेची मक्तेदारी नाही; ती प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मताच्या अधिकारावर उभी आहे. मताचा अधिकार अबाधित ठेवा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आंदोलनात अरविंद शिंदे, गोपाळदादा तिवारी, शिवाभाऊ मंत्री यांच्यासह महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: