Pune Acute Diarrhea Cases | पुण्यात तीव्र अतिसार रोगाचा उद्रेक! | पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ते बाबत प्रश्नचिन्ह

Homeadministrative

Pune Acute Diarrhea Cases | पुण्यात तीव्र अतिसार रोगाचा उद्रेक! | पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ते बाबत प्रश्नचिन्ह

Ganesh Kumar Mule Jul 29, 2026 8:46 PM

E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन
Air Quality Index | इलेक्ट्रिक वाहने आणि BSVI इंजिन असलेल्या वाहनांमुळे पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली | इलेक्ट्रिक वाहनांत 4.28 पटीने वाढ 
Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

Pune Acute Diarrhea Cases | पुण्यात तीव्र अतिसार रोगाचा उद्रेक! | पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ते बाबत प्रश्नचिन्ह

| 9599 रुग्णांची नोंद

| महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून धक्कादायक माहिती समोर

 

PMC ESR 2026 – (The Karbhari News Service) | पुणे महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2026 ‘ मधून पुण्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार सन 2025 मध्ये शहरात तीव्र अतिसाराचे 9599 रुग्ण आढळले असून, हा जलजन्य रोग सर्वाधिक प्रमाणात नोंदवला गेलेला आहे. (PMC Environmental Status Report)

अतिसाराचे रुग्ण सर्वाधिक
महापालिकेच्या साधरोग नियंत्रण विभागाकडून एकात्मिक आरोग्य माहिती मंच – एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रम (IHIP-IDSP) च्या माध्यमातून जलजन्य, अन्नजन्य आणि श्वसनमार्गे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांचे नियमित निरीक्षण केले जाते.

या अहवालातील आकडेवारीनुसार 2025 मध्ये नोंद झालेले जलजन्य व मल-मुखमार्गे पसरणारे रोग पुढीलप्रमाणे आहेत:

तीव्र अतिसार (एडीडी) –  9,599
विषाणुजन्य कावीळ – 135
विषमज्वर – 110
आमांश – 179
कॉलरा – 1

इतर रोगांच्या 4 पट रुग्ण
तीव्र अतिसार वगळता विषमज्वर, विषाणुजन्य कावीळ, कॉलरा आणि जिवाणूजन्य आमांश या चारही रोगांच्या एकत्रित रुग्णसंख्येच्या जवळपास 4 पट रुग्ण केवळ तीव्र अतिसाराचे नोंदवले गेले आहेत.

दूषित पाणी आणि स्वच्छता हे मुख्य कारण
अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, हे सर्व पाचही रोग मलदूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतात. त्यामुळे या रोगांचा एकत्रित भार हा शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची कार्यक्षमता यांचा सर्वाधिक विश्वासार्ह सार्वजनिक आरोग्य निर्देशक मानता येतो.

महापालिका प्रशासनाने या आकडेवारीचे विश्लेषण जलपुरवठा, सांडपाणी व स्वच्छता या माहितीबरोबरच जीबीएस उद्रेकाच्या अभ्यास सोबत करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. कारण या सर्व माहितीत रोगप्रसाराचे मूळ कारण दडलेले आहे.

दूषित पाणी आणि अन्नामुळे हे रोग होत असल्याने नागरिकांनी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्यावे, हात स्वच्छ धुवावेत आणि बाहेरील अन्न टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ञांकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या या अहवालामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती, पाणी मिश्रण आणि सांडपाणी मिसळण्याच्या प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: