High Level Committee for Pune Traffic | पुण्याच्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | उच्चस्तरीय समितीची स्थापना

Homeadministrative

High Level Committee for Pune Traffic | पुण्याच्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | उच्चस्तरीय समितीची स्थापना

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 8:45 PM

Ganesh Bidkar BJP | गणेश बिडकर यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती! | मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी
Pune PMC Tender Rate | देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या ४०-४५% लो रेटने निविदा | कामाचा दर्जा कसा राहणार?’ : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा सवाल
Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल

State Govt on Pune Traffic | पुण्याच्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तीन महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

पुण्यातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपायोजनांना गती मिळणार

 

Pune Traffic News – (The Karbhari News Service) –  देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारी वाहनसंख्या आणि तीव्र होत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या समन्वयातून शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती आणि कार्यकारी समिती स्थापन करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे. (Pune Breaking News)

या समित्यांच्या माध्यमातून भूमिगत बोगद्यांचे जाळे (Underground Tunnel Network), उच्च क्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (HCMTR) आणि पुणे इनर रिंग रोड या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या नियोजन, अंमलबजावणी, निधी उभारणी, जमीन संपादन आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वयाला गती मिळणार आहे.

सध्या पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे. जागतिक वाहतूक निर्देशांकामध्ये पुण्याचा समावेश वाहतूक कोंडी असलेल्या प्रमुख शहरांमध्ये होत असून, शहरातील रस्त्यांचे प्रमाणही राष्ट्रीय निकषांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन एकात्मिक आणि दूरदृष्टी ठेवून वाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज होती. याच पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली ही समिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती प्रकल्पांना धोरणात्मक दिशा, वित्तीय मान्यता आणि आवश्यक निर्णय घेणार असून, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती दैनंदिन प्रशासन, तांत्रिक अंमलबजावणी आणि विविध विभागांतील समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहे.
——
उच्चस्तरीय समितीत कोणाकोणाचा समावेश

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीत उपमुख्यमंत्री (नगरविकास), उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री (पुणे), नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, वित्त, महसूल, वन, पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष तसेच पीएमआरडीएचे महानगर आयुक्त यांचा समावेश असणार आहे.
—–
कार्यकारी समितीत कोणाकोणाचा समावेश

पुणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यामध्ये पीएमआरडीएचे महानगर आयुक्त, पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, शहर अभियंते, मुख्य अभियंते आणि अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश असेल
——-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हबच्या दिशेने आज महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात आधुनिक, सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे, सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करणे या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. तसेच पुण्याच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

| गणेश बिडकर, सभागृह नेते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0