Pramod Nana Bhangire |  पुण्यातील रस्त्यांची दुरावस्था | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा  प्रशासनाला इशारा – “तत्काळ  खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन”

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire |  पुण्यातील रस्त्यांची दुरावस्था | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा  प्रशासनाला इशारा – “तत्काळ  खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन”

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 8:28 PM

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस च्या इच्छुकांना अर्ज करण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत!
Katraj-Kondhwa Road | Pune Project | कात्रज- कोंढवा रस्ता वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका व पोलिसांनी एकत्रित काम करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
Chitale Bandhu Mithaiwale | सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी उद्योगाची सूत्रे  | संजय चितळे

Pramod Nana Bhangire |  पुण्यातील रस्त्यांची दुरावस्था | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा  प्रशासनाला इशारा – “तत्काळ  खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन”

 

Pune Potholes – (The Karbhari News Service) – गेले काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील जवळपास प्रत्येक रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. (Pune Water Logging)

भानगिरेंकडून सोशल मीडियावर पुराव्यासह आरोप
शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांवर साचले पाणी आणि मोठे खड्डे यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याची माहिती देण्यासाठी भानगिरे यांनी सोशल मीडियावर शहरातील विविध भागांचे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

उद्यापासून शहरभर पाहणी – तक्रारी सादर करणार
“उद्यापासून आम्ही  शहरातील प्रत्येक परिसरात जाऊन खड्डे आणि पाणी साचलेल्या जागांची माहिती गोळा करणार आहेत. ती सर्व माहिती महापालिका प्रशासनाला लेखी स्वरूपात सादर करण्यात येईल”, असे भानगिरे म्हणाले. त्यांनी प्रशासनाला तात्काळ खड्डे बुजवण्याची आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. “जर तत्काळ कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल”, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थायी समिती अध्यक्षांच्या घोषणेचा दाखला
दरम्यान, महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. “खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर ७२ तासांत ती निकाली निघाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल”, असे भिमाले म्हणाले होते. या घोषणेचा दाखला देत भानगिरे यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे.
“आम्ही प्रशासनाकडे लेखी तक्रारी सादर करणार आहोत. भिमाले यांनी दिलेल्या शब्दानुसार ७२ तासांत खड्डे बुजवून दाखवावेत आणि कारवाई करावी”, असे भानगिरे म्हणाले.

पुणेकर त्रस्त
सध्या खडकवासला धरण साखळीतून विसर्ग सुरू असल्याने शहरातील सखल भागातही पाणी साचत आहे. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता सर्वसामान्य पुणेकरांमधूनही जोर धरत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: