Shrinath Bhimale PMC | पुढील आठवड्यापासून महसूल वाढ समितीच्या बैठका  | महिनाभरात सीएसआर कक्षाची उभारणी पूर्ण होणार |  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | पुढील आठवड्यापासून महसूल वाढ समितीच्या बैठका  | महिनाभरात सीएसआर कक्षाची उभारणी पूर्ण होणार |  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Jul 02, 2026 9:00 PM

PMC Standing Committee | घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीने दिली मान्यता
PMC Standing Committee | महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजनेसाठी ४७.६५ कोटी |  स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता दिल्याचे श्रीनाथ भिमाले यांची माहिती
Swarget – Katraj Underground Metro | स्वारगेट – कात्रज भुयारी मेट्रो | बालाजी नगरला अतिरिक्त भुयारी स्टेशन | महापालिकेचे आर्थिक दायित्व नाही

Shrinath Bhimale PMC | पुढील आठवड्यापासून महसूल वाढ समितीच्या बैठका  | महिनाभरात सीएसआर कक्षाची उभारणी पूर्ण होणार |  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee : (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने महसूल वाढ समितीच्या नियमित बैठका पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असून, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी प्रभावीपणे आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र सीएसआर कक्षाची निर्मिती व प्रशासकीय रचना एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Revenue Committee)

महसूल वसुली अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढील आठवड्यापासून महसूल वाढ समितीच्या नियमित बैठका सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक बैठकीत विभागनिहाय करसंकलनाचा आढावा घेतला जाणार असून, ₹२५ लाख, ₹५० लाख, ₹१ कोटी आणि ₹५ कोटींपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची स्वतंत्र यादी सादर केली जाणार आहे. मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती, सीलिंग, लिलाव आणि अन्य कायदेशीर कारवाईचा कालबद्ध कार्यक्रमही तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

याचबरोबर, महापालिकेच्या विकासकामांसाठी खासगी उद्योगांकडून अधिकाधिक CSR निधी उपलब्ध करून घेण्यासाठी स्वतंत्र सीएसआर कक्ष उभारण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, त्याची प्रशासकीय रचना, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि कार्यपद्धती एका महिन्याच्या आत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

या कक्षामार्फत उद्योग, आयटी कंपन्या आणि विविध संस्थांशी समन्वय साधून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर सीएसआर निधी उपलब्ध करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळी श्रीनाथ भिमाले म्हणाले, “महापालिकेचे उत्पन्न वाढविणे आणि थकीत कराची प्रभावी वसुली करणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. महसूल वाढ समितीच्या नियमित बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. त्याचबरोबर स्वतंत्र सीएसआर कक्षाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधी शहराच्या विकासासाठी प्रभावीपणे वापरण्यात येईल.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: