Pune PMC Schools | PMC च्या 25 वर्षांपेक्षा जुन्या शाळा-शिक्षक निवासांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!

Homeadministrative

Pune PMC Schools | PMC च्या 25 वर्षांपेक्षा जुन्या शाळा-शिक्षक निवासांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 12:31 PM

PMC Schools | महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार 
PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया 
PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी 

Pune PMC Schools | PMC च्या 25 वर्षांपेक्षा जुन्या शाळा-शिक्षक निवासांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!

| वैशाली बनकर यांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेच्या 25 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या शाळा आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच हडपसर सातवाडी प्रभाग क्रमांक 16 मधील गाडीतळ परिसरातील शिक्षकांच्या अत्यंत जुन्या आणि जीर्ण झालेल्या क्वार्टर्सचेही स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. (PMC Schools Structural Audit)

हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि माजी महापौर वैशाली बनकर (Vaishali Bankar NCP) यांनी स्थायी समितीत मांडला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

वैशाली बनकर यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये PMC च्या अनेक शाळा आहेत. यातील अनेक शाळांच्या इमारती 25 वर्षांपेक्षा जास्त जुनी झालेली आहेत. अशा जुन्या इमारतींची सुरक्षा आणि मजबुती तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर हडपसर सातवाडी प्रभाग क्रमांक 16 मधील गाडीतळ परिसरात असलेल्या शाळेसह शिक्षकांच्या क्वार्टर्सही अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतींचेही तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

गेल्या काही वर्षांत राज्यात जुन्या शाळांच्या इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे PMC शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता संबंधित विभागाकडून जुन्या शाळा आणि क्वार्टर्सची यादी तयार करून त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट केले जाणार आहे. ऑडिट अहवालानुसार दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा इतर उपाययोजना केल्या जातील.

या निर्णयामुळे शहरातील PMC शाळांमधील हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: