PMC 360 Project Award | राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ : पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड!

Homeadministrative

PMC 360 Project Award | राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ : पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड!

Ganesh Kumar Mule Jul 02, 2026 8:29 PM

Shivsena UBT on Sinhgadh Road Flyover | सिंहगड रोड उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे आगळेवेगळे आंदोलन
NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन
PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन 

PMC 360 Project Award | राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ : पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला सिल्व्हर अवॉर्ड!

जयपूर येथील सोहळ्यात डॉ. जितेंद्र सिंह, कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते सन्मान; डिजिटल प्रशासनात पुण्याचा राष्ट्रीय गौरव

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड झाली. (Pune Municipal Corporation – PMC)

जयपूर, राजस्थान येथे १ व २ जुलै २०२६ रोजी संपन्न झालेल्या २९ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार सोहळ्यात आज, दि. २ जुलै २०२६ रोजी हा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला औपचारिकरीत्या प्रदान करण्यात आला.

कोणत्या श्रेणीत मिळाला पुरस्कार?  ‘ई-गव्हर्नन्सअंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या श्रेणीत ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाला हा सिल्व्हर अवॉर्ड देण्यात आला. दि. ४ जून २०२६ रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

हा पुरस्कार भारत सरकारचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, पंतप्रधान कार्यालय व कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय, तसेच राजस्थान सरकारचे माहिती तंत्रज्ञान व संप्रेषण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजीत नायर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप आणि वंदना भांगरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पीएमसी ३६०’ म्हणजे काय?

महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, प्रजीत नायर आणि ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपाने डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबवली. ‘पीएमसी ३६०’ अंतर्गत :  महापालिकेच्या संकेतस्थळाचे संपूर्ण आधुनिकीकरण  ऑनलाइन सेवा पोर्टल विकसित  तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन प्रणाली बळकट  व्हॉट्सअॅप आधारित नागरिक सेवा सुरू  एआय व जीआयएस आधारित तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर  कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा विकसित
यामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

राष्ट्रीय मूल्यमापनात ठरला सरस  

या सर्व उपक्रमांचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड झाली. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

पारदर्शक प्रशासनाची राष्ट्रीय पावती’

“हा सन्मान पुणे महानगरपालिकेच्या तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या वाटचालीची राष्ट्रीय स्तरावरील पावती आहे,” अशी प्रतिक्रिया मनपा प्रशासनाने दिली. समृद्ध ऐतिहासिक वारसा जपत पुणे शहर आज डिजिटल प्रशासनातील देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मधील हा सन्मान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञान विभाग, तंत्रज्ञान भागीदार आणि सर्व पुणेकर नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: