PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!

Homeadministrative

PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!

Ganesh Kumar Mule Jul 02, 2026 9:32 PM

Hourly Basis Teacher | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता
MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला
Maharashtra Day | राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्तांचे हे नवीन आदेश 

PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे आजी-माजी सदस्य तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या आजी-माजी सदस्यांना आणि त्यांच्या पात्र कुटुंबीयांना महापालिकेच्या ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेच्या आर्थिक सहाय्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Shrinath Bhimale PMC)

महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, शहराच्या विकासात, लोकसेवेत आणि प्रशासकीय कामकाजात योगदान दिलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संरक्षण उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना’ राबविण्यात येते. या योजनेची व्याप्ती वाढवून आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे आजी-माजी सदस्य, पीएमपीएमएलचे आजी-माजी सदस्य तसेच त्यांच्या पती किंवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग अपत्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत उपचारांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. विशेषतः हृदयरोग, कर्करोग, शस्त्रक्रिया किंवा इतर गंभीर आजारांच्या उपचारांवर होणारा मोठा खर्च कमी करण्यासाठी या योजनेचा आधार मिळू शकतो. निवृत्तीनंतर नियमित वैद्यकीय सुविधांचा अभाव भासत असलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांना उपचारांसाठी आर्थिक संरक्षण उपलब्ध होणार आहे. वाढत्या आरोग्य खर्चाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळाल्याने वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे सुलभ होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: