Mayor Manjusha Nagpure on Standing Committee | ‘स्थायी समिती शहराच्या प्रश्नांसाठी, फक्त प्रभागासाठी नाही’ | महापौर मंजुषा नागपुरेंनी समिती सदस्यांचे टोचले कान

HomeBreaking News

Mayor Manjusha Nagpure on Standing Committee | ‘स्थायी समिती शहराच्या प्रश्नांसाठी, फक्त प्रभागासाठी नाही’ | महापौर मंजुषा नागपुरेंनी समिती सदस्यांचे टोचले कान

Ganesh Kumar Mule Jun 26, 2026 8:00 AM

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे महापौरांचे आदेश
Palakhi Sohala 2026 – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका सज्ज- महापौर मंजुषा नागपुरे
Pune Water Cut News | २२ जुलैपर्यंत पुण्यातील पाणीकपात रद्द | परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय | महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा

Mayor Manjusha Nagpure on Standing Committee | ‘स्थायी समिती शहराच्या प्रश्नांसाठी, फक्त प्रभागासाठी नाही’ | महापौर मंजुषा नागपुरेंनी समिती सदस्यांचे टोचले कान

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापौर मंजुषा नागपुरे यांनी अचानक प्रवेश करत सदस्यांना चांगलेच सुनावले. “स्थायी समिती ही शहराचे प्रश्न मांडण्यासाठी असते. इथे फक्त प्रभागाचे प्रश्न मांडले जाऊ नयेत. हा नियम विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांच्या सदस्यांना लागू आहे,” अशा शब्दांत त्यांनी सदस्यांचे कान टोचले.  (Pune Municipal Corporation – PMC)

मागील काही बैठकांमध्ये समितीतील सदस्य फक्त आपल्या प्रभागापुरते प्रश्न उपस्थित करत असल्याचे निदर्शनास आले होते. रस्ते, ड्रेनेज, कचरा, पाणी यांसारखे स्थानिक मुद्देच वारंवार मांडले जात होते. यावर नाराजी व्यक्त करत महापौर म्हणाल्या, “स्थायी समिती पूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे, फक्त प्रभागाचे नाही. सदस्यांनी यावर काळजीपूर्वक लक्ष द्यावे.”

महापौरांनी कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य न करता सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांच्या सदस्यांना समज दिली. शहर पातळीवरील धोरणात्मक निर्णय, मोठे प्रकल्प, आर्थिक नियोजन, संपूर्ण शहराला लागू होणाऱ्या योजना यावर चर्चा अपेक्षित असताना बैठकीचा वेळ प्रभागातील प्रश्न यावरच चर्चा होत  असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या अचानक प्रवेशाने आणि स्पष्ट शब्दांतील मार्गदर्शनामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली होती.

महापौरांच्या सूचनेनंतर यापुढील बैठकांमध्ये शहराच्या व्यापक हिताचे प्रश्न मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: