Pune BRTS | विश्रांतवाडी ते फुलेनगर मार्गावरील बीआरटी मार्गिका काढण्याच्या प्रस्तावावर महापालिका प्रशासन सकारात्मक!

Homeadministrative

Pune BRTS | विश्रांतवाडी ते फुलेनगर मार्गावरील बीआरटी मार्गिका काढण्याच्या प्रस्तावावर महापालिका प्रशासन सकारात्मक!

Ganesh Kumar Mule Jun 05, 2026 5:10 PM

PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण | पथ विभागाचा उपक्रम
PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली! 
PMC Ward 30 – Karvenagar – Hingane Home Colony | प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी  | प्रभागाच्या हद्दी आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात

Pune BRTS | विश्रांतवाडी ते फुलेनगर मार्गावरील बीआरटी मार्गिका काढण्याच्या प्रस्तावावर महापालिका प्रशासन सकारात्मक!

| पीएमपीएमएलचा विरोध, येरवडा वाहतूक विभागाचा पाठिंबा

| स्थायी समिती घेणार अंतिम निर्णय

गणेश मुळे. 

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड या गजबजलेल्या मार्गावरील बीआरटी मार्गिका काढून टाकण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस चे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव दिला होता. वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांकडून ही मागणी होत आहे.  असे प्रस्तावात म्हटले होते. यावर आता प्रशासनाकडून अभिप्राय सादर करण्यात आला आहे. पथ विभागाने म्हटले आहे की, पुणे आळंदी रस्ता येथील बीआरटी काढून टाकल्यानंतर बस आणि इतर वाहनांना दोन लेन खुल्या होणार आहेत. ते नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यावर आता स्थायी समिती अंतिम निर्णय घेणार आहे.

सुहास टिंगरे यांनी काय केल्या होत्या मागण्या?

१. विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोडवरील बीआरटी मार्गिका तात्काळ काढण्यात यावी.  २. रस्त्याची पूर्ण रुंदी सर्वसामान्य वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावी.  ३. वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी अभ्यास करून योग्य नियोजन करावे.  ४. भविष्यात बीआरटी प्रकल्प राबविताना स्थानिक परिस्थिती, वाहतुकीचा ताण आणि नागरिकांचे मत विचारात घ्यावे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम  यांनी स्थायी समिती समोर सादर केलेल्या अभिप्राय नुसार , सध्याच्या परिस्थितीत ही बीआरटी मार्गिका वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. मार्गिका काढल्याने रस्त्याची पूर्ण रुंदी सर्व वाहनांसाठी उपलब्ध होऊन वाहतूक सुरळीत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
मात्र पीएमपीएमएलने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. सध्या या मार्गावर दररोज १२६ बसांद्वारे ८० हजार प्रवासी प्रवास करतात. मार्गिका काढल्यास वाहतूक कोंडी वाढून बससेवा विस्कळीत होईल, असे पीएमपीएमएलचे म्हणणे आहे.

दुसरीकडे येरवडा वाहतूक विभागाने बीआरटी मार्गिका काढण्याला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते यामुळे अपघात कमी होतील आणि रस्त्याची रुंदी वाढेल. विश्रांतवाडी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे मार्गिकेची उपयुक्तता कमी झाल्याचेही पत्रात नमूद आहे.

महापालिका पथ विभागाने म्हटले आहे की,  या मार्गावर साठे बिस्किट बस थांबा येथे बीआरटी मार्गिका खंडित झाली असून, येरवडा मनोरुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बॉम्बे सॅपर्स चौक अशा ठिकाणी दुसऱ्या बाजूची बीआरटी मार्गिका ओलांडून वाहने ये-जा करतात. त्यामुळे अपघातप्रवणता वाढली आहे. तसेच बीआरटी मार्गिकेतून विरुद्ध दिशेने दुचाकी वाहनं येऊन अपघात होत आहेत.

विश्रांतवाडी चौक येथे सुरू असलेल्या भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे तसेच संगमवाडी, आंबेडकर चौक, येरवडा-परकुटी आणि डेक्कन कॉलेज रस्त्यावरील १० ते १५० मीटरच्या कामांमुळे उर्वरित बीआरटी मार्गिकेची उपयुक्तता लक्षणीयरीत्या घटली आहे, असेही नमूद आहे.

पथ विभागाने म्हटले आहे की, पुणे आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्गिका काढल्यास वाहतूक कोंडी सुटेल पुणे आळंदी मार्गावर बिंदुमाधव ठाकरे चौक ते साठे बिस्कीट दरम्यान बीआरटी मार्गिकेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा वेळ वाया जात आहे.  बीआरटी मार्गिका काढून टाकल्यास बस सेवेसह इतर वाहनांसाठी अतिरिक्त २ लेन खुल्या होतील आणि नागरिकांची सोय होईल.

हा अभिप्राय स्थायी समितीच्या अवलोकनार्थ सादर केला आहे. अंतिम निर्णय आता  स्थायी समिती घेणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: