PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी

Homeadministrative

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी

Ganesh Kumar Mule Jun 04, 2026 5:21 PM

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 
PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील पदोत्रतीचे स्तर कमी करण्यास मंजुरी  | काही पदांची वेतनश्रेणी वाढवली
The Karbhari Impact | PMC Employees | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना मानधन मिळणे सुरु!

PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी!

| पावसाळापूर्व कामांचा आढावा रखडला

| आयुक्तांनी हजेरीचे आदेश देऊनही अतिरिक्त आयुक्त व खातेप्रमुख गैरहजर

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज होणारी साप्ताहिक बैठक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे तहकूब करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी उपस्थित राहण्याचे निर्देश देऊनही अतिरिक्त आयुक्त आणि काही खातेप्रमुख बैठकीस उपस्थित न राहिल्याने समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी हा निर्णय घेतला. (PMC Officers)

स्थायी समितीत मान्य केलेल्या ठरावानुसार, आजच्या बैठकीत आगामी पावसाळ्यापूर्व करावयाची कामे, नाले सफाई, शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वीचे नियोजन तसेच पालखीपूर्व कामे या अत्यावश्यक विषयांचा आढावा घेण्याचा सदस्यांचा मानस होता.

मात्र प्रशासनाने या महत्त्वाच्या कामांप्रती गांभीर्य न दाखवल्याचे आणि उदासिनता दिसून आल्याचे लक्षात घेऊन आजची सभा तहकूब करण्यात आल्याचे ठरावात म्हटले आहे.

अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक आता गुरुवार, ११ जून रोजी सकाळी १:३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना नाले सफाईसारखी कामे रखडल्याने शहरात पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच शाळा सुरू होण्यापूर्वीच्या तयारीचा आणि आषाढी पालखीपूर्व कामांचा आढावा न झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बैठकीत चर्चा करण्यासाठी अधिकारी असणे गरजेचे होते, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: