Omprakash Divate IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती  | राज्य सरकारकडून आदेश जारी

Homeadministrative

Omprakash Divate IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती | राज्य सरकारकडून आदेश जारी

Ganesh Kumar Mule Apr 28, 2025 8:02 PM

Pune PMC News | समाविष्ट 9 गावांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर | सरकारने मागवल्या हरकती आणि सूचना 
Shrinath Bhiamle on PMC Budget | अंदाजपत्रक एका वर्षाचे सादर करणार असलो तरी शहराचे ५ वर्षांचे नियोजन करणार | श्रीनाथ भिमाले यांनी दिला विश्वास
Safai Karmchari | पुणे महानगरपालिकेने ‘वाल्मिकी भवन’ उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी – भगवत प्रसाद मकवाना | सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

Omprakash Divate IAS | पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती

| राज्य सरकारकडून आदेश जारी

 

PMC Additional Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे (Omprakash Divate IAS) यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या वतीने या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांपासून (PMC Officers)  पुन्हा एकदा हे पद दूर जाताना दिसत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील ओमप्रकाश दिवटे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्रति नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी किंवा महापालिका अधिकाऱ्या मधून पदोन्नती ने हे पद उपलब्ध होईपर्यंत असणार आहे. असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान महापालिका अधिकाऱ्याच्या हातून पुन्हा हे पद निसटले आहे. तीन अतिरिक्त आयुक्तांच्या पदांपैकी एक पद महापालिका अधिकाऱ्या साठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र पदोन्नती ने अजून महापालिकेचा अधिकारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र आता सरकारने हे पद प्रति नियुक्तीने भरले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0