PMC Contract Employees | मनपाच्या १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळावी | काँग्रेसचा स्थायी समितीत प्रस्ताव

Homeadministrative

PMC Contract Employees | मनपाच्या १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळावी | काँग्रेसचा स्थायी समितीत प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Jun 01, 2026 9:10 PM

Pune Congress | पुण्यात “छात्रों की गुंज” अंतर्गत भव्य कॅन्डल मार्च |  हजारो पुणेकर रस्त्यावर
PMC Employees Transfer | महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत  | अरविंद शिंदे, चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव 
Chandu Kadam Congress | पुणे महानगरपालिका  काँग्रेस पक्षाच्या ‘गटनेते’ पदी ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची निवड!

PMC Contract Employees | मनपाच्या १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळावी | काँग्रेसचा स्थायी समितीत प्रस्ताव

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या दहा हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे. ईएसआयसी योजनेची वेतन मर्यादा २१,००० रुपये असल्याने कुशल व अर्धकुशल कामगार या योजनेपासून वंचित राहत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (PMC Standing Committee)

काय आहे प्रस्ताव?

काँग्रेसचे सदस्य रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम व सुनील  शिंदे यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. पुणे महानगरपालिकेत सध्या दहा हजारांपेक्षा जास्त कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणून ईपीएफ व ईएसआयसीची सुविधा देणे क्रमप्राप्त आहे.

२१,००० ची मर्यादा ठरतेय अडसर

ईएसआयसी योजनेची वेतन मर्यादा २१,००० रुपये इतकी आहे. ठेकेदारामार्फत घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांपैकी कुशल व अर्धकुशल कामगारांना २१,००० रुपयांपेक्षा जास्त वेतन असल्याने त्यांना ईएसआयसी अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळत नाही.

तसेच यथावकाश अकुशल कामगारांची वेतन मर्यादा देखील पुढील सहामाहीत महागाई भत्त्यात वाढ होऊन २१,००० रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे कंत्राटी अकुशल कामगारांनादेखील ईएसआयसी अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळणार नाही.

प्रस्तावात म्हटले आहे की, सदरचे १०,००० कंत्राटी कामगार वैद्यकीय योजनेपासून वंचित राहणार आहेत. हे कर्मचारी अल्प वेतनावर काम करीत असून पुणे मनपाच्या कायम सेवकांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र त्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा सुविधा मिळणार नाही.

काँग्रेसची मागणी काय?

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना मनपाच्या अंशदायी सहाय्य योजनेचे सभासदत्व विना शर्त देण्यात यावे, अशी मागणी चंदूशेठ कदम व सुनील शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेस सदस्यांनी स्थायी समितीला विनंती केली आहे की, मनपाच्या विविध विभागांमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कंत्राटी कामगारांचा वैद्यकीय सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवावा. या प्रस्तावावर स्थायी समितीच्या आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: