Pune PMC News | मुख्यमत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निमंत्रणच दिले नाही!  | मित्र पक्षाच्या आमदाराला देखील भाषण करण्याची संधी नाही!

Homeadministrative

Pune PMC News | मुख्यमत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निमंत्रणच दिले नाही! | मित्र पक्षाच्या आमदाराला देखील भाषण करण्याची संधी नाही!

Ganesh Kumar Mule May 18, 2026 9:15 PM

CM Devendra Fadnavis | महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी 
GST | तुम्ही व्यवसाय करत असाल, तर जाणून घ्या की जीएसटी नोंदणी कधी महत्त्वाची ठरते|  त्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या

Pune PMC News | मुख्यमत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निमंत्रणच दिले नाही!

| मित्र पक्षाच्या आमदाराला देखील भाषण करण्याची संधी नाही!

 

Pune News – (The Karbhari News Service) – रविवारी पुण्यात पुणे महापालिकेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले. मात्र हडपसर येथे झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षातील नगरसेवकांना निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. तसेच स्थानिक आमदार चेतन तुपे यांना देखील स्टेजवर असून भाषण करण्याचे संधी देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी पक्षाने  राजशिष्टाचार पाळण्याची मागणी महापौर यांच्याकडे मुख्य सभेत केली. (Pune Municipal Corporation – PMC)

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शहरात रविवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. पुणे महापालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील एक कार्यक्रम हडपसर परिसरात झाला. या ठिकाणी समान पाणीपुरवठा योजना अंतर्गत ९ पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक आमदार चेतन तुपे यांना भाषण करण्याची संधी दिली नाही, याबाबत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी महापौर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तसेच प्रोटोकॉल काय आहे, याची विचारणा केली.

यावर महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, भाषण करण्या अगोदर महापौर कार्यालयात संबंधित आमदारानी कळविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आमदारांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. निकम यांनी पुढे सांगितले की, याच कार्यक्रमात उपमहापौर यांची खुर्ची मागच्या रांगेत होती. मी ती पुढे घ्यायला सांगितली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांनी तक्रार केली की प्रभाग १४ आणि १५ मधील नगरसेवकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच आम्ही आत येण्याचा प्रयत्न केला, तरी देखील आम्हाला आत येऊ दिले नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: