Pune News | लहान मुलीवर अन्याय अत्याचार करणार्‍या आरोपींना चौरंग करण्याची शिक्षा द्यावी

HomeBreaking News

Pune News | लहान मुलीवर अन्याय अत्याचार करणार्‍या आरोपींना चौरंग करण्याची शिक्षा द्यावी

Ganesh Kumar Mule May 07, 2026 8:17 AM

Nanded City Property tax PMC | नांदेड सिटी टाऊनशिप मधील लोकांना कर भरावा लागणार | महापालिकेकडून कर आकारणी सुरु | 30 जानेवारी पर्यंत PT3 अर्ज भरून देण्यासाठी मुदत
Pune District Voting Awareness | जिल्हास्तरीय स्वीप कार्यक्रमाचा शनिवारवाडा येथे शुभारंभ | जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपर्यंत विविध मतदार जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
Saving Account | बचत खात्यात जास्त रोख ठेवण्यापेक्षा येथे गुंतवणूक करणे चांगले | पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला उच्च परतावा मिळेल

Pune News | लहान मुलीवर अन्याय अत्याचार करणार्‍या आरोपींना चौरंग करण्याची शिक्षा द्यावी

| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन

 

NCP SCP Pune – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे सहा दिवसांपूर्वी साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.ती घटना थांबत नाही तोवर, पुणे शहरातील पर्वती येथे काल आजोबाकडून त्याच्याच 9 वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज टिळक रोड वरील अभिनव कॉलेज जवळील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या पाट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले. (Pune Breaking News)

यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले, पुणे शहर आणि जिल्हय़ात मागील सहा दिवसाच्या काळात दररोज लहान मुली,तरुणी आणि महिला यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.या घटना पाहून मन हेलावून गेले आहे.या सर्व घटनामधून एकच दिसून येत ते म्हणजे प्रत्येकजण स्त्री ला एका विकृत नजरेतून आणि वासनेतून पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या चौरंग करण्याची शिक्षा दिली होती.त्या प्रमाणे आताच्या काळात आशा नराधमास शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढील काळात असे कृत्य होणार नाही.अशा स्वरूपाचा कायदा करावा,अशी आमची मागणी आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, राज्यभरात मागील काही दिवसातील अन्याय अत्याचाराच्या घटना पाहिल्यावर महिलांना सुरक्षितता देण्यात,महायुती सरकार अपयशी ठरले आहेत.तर या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असून या पदाला न्याय देण्यात ते अपयशी ठरले आहेत.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन एखाद्या सक्षम आमदाराला गृहमंत्री द्यावा, त्याच बरोबर महायुती सरकारने शक्ती कायदा अमलात आणावा,अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष श्रीकांत पाटील , प्रदेश युवती अध्यक्ष मनाली भिलारे , युवक अध्यक्ष किशोर कांबळे , मदन कोठे आहे रोहन पायगुडे, खूने पाटील , संजय गाडे, युसुफ शेख, श्रद्धा जाधव, संजय गायकवाड, अजिंक्य पालकर, समीर पवार, अमोघ ढमाले उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: