Mohan Joshi Congress | खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

HomeBreaking News

Mohan Joshi Congress | खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

Ganesh Kumar Mule Apr 20, 2026 7:32 PM

Pune Airport New Terminal | लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल झाले ; पण, प्रवासी अद्याप सुविधांपासून वंचितच
PMC JICA Project | ९ वर्षे होऊनही जायका प्रकल्प पुरा होईना!
Pune Congress Gandhigiri | पेट्रोल डिझेल दरवाढ, लूट विरोधातील काँग्रेसच्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलनाची सांगता

Mohan Joshi Congress | खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल


Pune Breaking News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वे गाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे दुर्लक्ष करून फारशी मागणी नसलेली पुणे – जबलपूर रेल्वे सेवा सुरू करणारे केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे की जबलपूरचे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे आज (सोमवारी) केला आहे.

पुणे – जबलपूर विशेष रेल्वे सेवेला आमचा विरोध नाही. पण, पुणेकरांच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या मागण्या दुर्लक्षित करून जबलपूरसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा भाजप सरकारचा अट्टाहास कशासाठी आहे?, त्यांना कोणाचे राजकारण साधायचे आहे? असे प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रातील गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत आहे आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरून सोडल्या जात आहेत. हा भेदभाव धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे पुण्यातील प्रवासी कोल्हापूर, मुंबई भागात पुणे स्थानकावरून जात असताना त्यांना त्यासाठी हडपसरला जायला लावण्याचा आटापिटा त्रासदायक आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक आणि पुणे ते संभाजीनगर अशा जास्त वर्दळीच्या मार्गावर जास्त गाड्या सुरू व्हाव्यात अशी महाराष्ट्रातील लोकांची मागणी आहे. या मागणीकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष आहे. पुण्यातील रेल्वे सेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणेकर अनेक वर्षे करीत आहेत. पुणे – लोणावळा लोकल सेवा विस्कळीत आहे. त्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेबाबतही पुणेकरांच्या मनात भीती आहे. स्थानकावर अस्वच्छता असते, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, अशा तक्रारी प्रवाशांच्या आहेत, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मेट्रो असो, अथवा रेल्वे भाजपच्या सरकारकडून गेली १२ वर्षे पुणेकरांवर अन्यायच होत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: