Chandu Kadam Congress | ‘मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी खर्च, मग रस्त्यावर पाणी का साचते?’ | काँग्रेस गटनेते चंदू कदम यांचा आयुक्तांना सवाल

Homeadministrative

Chandu Kadam Congress | ‘मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी खर्च, मग रस्त्यावर पाणी का साचते?’ | काँग्रेस गटनेते चंदू कदम यांचा आयुक्तांना सवाल

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 8:45 PM

PMRDA Lottery | पीएमआरडीएतर्फे 1337 सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ | इच्छुकांना परवडणाऱ्या घरासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून करता येणार अर्ज
DIO Pune | जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू
Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

Chandu Kadam Congress | ‘मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी खर्च, मग रस्त्यावर पाणी का साचते?’ | काँग्रेस गटनेते चंदू कदम यांचा आयुक्तांना सवाल

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुण्यात दोन दिवस झालेल्या तुरळक पावसातच प्रमुख रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक खोळंबल्याने काँग्रेसने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही समस्या कायम असल्याने कामांचा खर्च व त्यातून कोणत्या समस्या सुटणार याची माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

आयुक्तांना दिले निवेदन
कदम यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले २ दिवस शहरात तुरळक पाऊस झाला. या पावसात देखील शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. आता येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. मागील वर्षातील अनुभव पाहता शहरात उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत असल्याचे त्यांनी नमूद केले.

खर्चाचा हिशोब द्या
“प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी अनेक कामे करण्यात आली असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सबब या सर्व कामांना एकूण किती खर्च झाला, सदर कामांमुळे कोणकोणत्या समस्या उद्भवणार नाहीत याची माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी,” अशी मागणी कदम यांनी केली आहे.

नालेसफाई, पाणी निचऱ्यावर भर
सध्या शहरातील नालेसफाई पूर्ण झाली की नाही याचा तातडीने आढावा घ्यावा. जेथे सफाई बाकी आहे तेथे तातडीने नाले सफाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सखल भागात, प्रमुख रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होते. त्यापासून सुटका मिळण्यासाठी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

धोकादायक झाडे व फलकांवर कारवाई करा
वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे धोकादायक झाडांची छाटणी तत्काळ पूर्ण करण्यात यावी. तसेच धोकादायक जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नियमबाह्य व धोकादायक फलकांवर कडक कारवाई करण्याची मागणीही कदम यांनी केली आहे.

“उपरोक्त सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागास त्वरित मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत,” अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: