PMC Garden Department | उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुणे महापालिकेने उद्यानाच्या वेळा वाढवल्या!
Pune PMC News – (The Karbhari News Servie) – सद्यस्थितीत उन्हाळा सुरू होत असून लहान मुलांसाठी देखील सुट्टीचा कालावधी हे. त्यामुळे नागरिक/लहान मुले सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये येत असतात. उन्हाळाच्या कालावधीत नागरिक/ लहान मुलांना जास्तीत जास्त कालावधीकरिता उद्यानांचा लाभ मिळावा या पार्श्वभुमीवर उन्हाळ्या निमित्ताने १५ एप्रिल ते १५ जुन २०२६ या कालावधीकरिता पुणे महानगरपालिकेच्या सर्व उद्यानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. अशी माहिती सह महापालिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे यांनी दिली. (Dr Ashok Ghorpade PMC)
अशा असतील वेळा
उद्याने – सकाळी ६.०० ते सकाळी ११.०० व सायंकाळी ४.०० ते ९.००
मत्सालय – सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० व सायंकाळी ४.०० ते ९.००
यापूर्वी छोटी उद्याने ही सकाळी ६ ते १० तर सायंकाळी ४ ते ८:३० पर्यंत सुरु ठेवण्यात येत होती. त्यात आता बदल करून सर्वाना समान वेळा ठेवण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६६(१०) अन्वये सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने/बागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २१६ उद्याने,एक मत्सालय व एक प्राणी संग्रहालय विकसित केलेली आहे. सदर उद्यानांचे विकसन, सुशोभिकरण,देखरेख,देखभाल व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. उद्यानांमध्ये नागरिक / लहान मुले, परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. पुणे शहारातील विविध उद्यानांना प्रवेशशुल्क असल्याने, त्याद्वारे पुणे महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होत आहे. त्यामुळे वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे डॉ घोरपडे यांनी सांगितले.
सर्व उद्यान अधिक्षक/हॉर्टीकल्चर सुपरवायझर /हॉर्टीकल्चर मिस्त्री/प्र. हॉर्टीकल्चर मिस्त्री यांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या उद्यानांमधील कार्यरत सेवक / सुरक्षारक्षक यांना याबाबतच्या सुचना देवून, उद्यानांच्या वेळेत करण्यात आलेल्या बदला बाबतचा फलक उद्यानांच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात यावा. असे आदेश डॉ घोरपडे यांनी दिले आहेत.

COMMENTS