Pune Breaking News | आजच्या मुसळधार पावसाने ८२ झाडपडी च्या घटना | एका महिलेचा मृत्यू | खूप ठिकाणी पाणी साचले तर एक सीमाभिंत कोसळली
Pune Rain News – (The Karbhari News Service) आज शहर परिसरात मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अग्निशमन दल नियंत्रण कक्षात दुपारी ०२•३० ते सायंकाळी ०६•०० वाजेपर्यंत झाडपडीच्या एकुण ८२ तर पाणी साचल्याच्या ०६ आणि सीमा भिंत पडल्याची ०१ घटनेची नोंद झाली. सिंहगड रस्त्यावर एक मोठे झाड कोसळून एक महिला गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची सर्व यंञणा कार्यान्वित असून २० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यु व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत झाडपडीच्या 82 वर्द्यांपैंकी आत्तापर्यंत 52 पुर्ण केल्या असून पुढील काम सुरु आहे. अशी माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Unseasonal Rain)
सिंहगड रोड नवश्या मारुती मंदिर मागे एक एक झाड पडले असता त्याखाली महिला अडकले असल्याचे कॉल आला असता त्याच वेळी सिंहगड रोड अग्निशमन केंद्राची गाडी त्वरती रवाना करण्यात आली . दलाच्या मदतीने व तेथील नागरिकांच्या मदतीने सदर महिलेला काढून त्वरित उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आले. मात्र तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. महिलेचे नाव श्रीमती रंजना गिरी असे आहे.
दुपारी 2:30 मिनिटांनी मध्यवर्ती अग्निशमन केंद्र मध्ये पावसामुळे कॉल येण्यास सुरुवात झाली .

>झाडपडी कॉल – वानवडी, पुणे विद्यापीठ रोड, बाणेर, चव्हाण नगर, औंध , डीपी, सिंहगड रोड, बिबेवाडी गंगाधाम ,जनता वसाहत, नवीन प्रशासकीय इमारत काळेपडळ , तरवडे वस्ती , बेटी गावडे रोड, ससाणे नगर, ताडीवाला रोड ,कोरेगाव पार्क ,महर्षी नगर, धनकवडी, कात्रज वारजे, वडगाव शेरी कात्रज, पाषाण या ठिकाणी झाडपडीचे कॉल आले आहे व त्या ठिकाणी कामे सुरू आहेत.
>पाणी शिरणे :- वारजे सह्याद्री शाळा, रविवार पेठ, शैलेसबरी पार्क , पाटील प्लाझा या ठिकाणी पाणी शिरल्याचे कॉल .

कोंढवे धावडे भीमनगर येथील राधिका अपार्टमेंट (पार्किंग + 4 मजली) इमारतीच्या टेरेस वरती बनवलेल्या फ्लॅटचे लोखंडी पत्रा व लोखंडी अंगल चे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले होते. जवानांनी घन, कटवणी , आणि ग्रँडर च्या साह्याने कट करून रस्त्यातून बाजूला केले व रस्ता वाहतुकीस मोकळा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नाही.

COMMENTS