Pune Metro News | पुणे मेट्रोचा १० कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार | मेट्रो ट्रेन आणि स्थानक परिसरात  विशेष गस्त!

Homeadministrative

Pune Metro News | पुणे मेट्रोचा १० कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार | मेट्रो ट्रेन आणि स्थानक परिसरात  विशेष गस्त!

Ganesh Kumar Mule Oct 06, 2025 8:35 PM

Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक 
Manjri Flyover | मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
J P Nadda on GBS | जी बी एस संसर्गजन्य नाही | केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती

Pune Metro News | पुणे मेट्रोचा १० कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार | मेट्रो ट्रेन आणि स्थानक परिसरात  विशेष गस्त!

 

Pune Metro – (The Karbhari News Service) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे नवे पर्व सुरू करणाऱ्या पुणे मेट्रोने आज एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आपल्या सेवेच्या सुरुवातीपासून, दिनांक ६ मार्च २०२२ ते ४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मेट्रोने १० कोटी (100 Million) प्रवाशांची यशस्वीरित्या वाहतूक केली आहे. (Pune News)

ही कामगिरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी मेट्रोला दिलेल्या प्रचंड आणि सातत्याने वाढणाऱ्या प्रतिसादाचे द्योतक आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे आभार मानले. “पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे,” असे ते म्हणाले. या १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकराचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून आणि अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. ६ मार्च २०२२ रोजी पहिला टप्पा (PCMC ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय) मा. पंतप्रधान यांच्या हस्ते सुरू झाल्यावर अंदाजित २०,००० – ३०,००० दैनंदिन प्रवासी संख्या होती. त्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण विस्तारामध्ये (फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक) दैनंदिन प्रवाशांचा आकडा १,००,००० ते १,१०,००० पर्यंत पोहोचला. ६ मार्च २०२४ रोजी पूर्व-पश्चिम कॉरिडोरची पूर्णता (रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी) झाल्यावर ही संख्या १,२०,००० ते १,३०,००० झाली आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी भूमिगत मार्गाची पूर्णता (जिल्हा न्यायालय ते स्वारगेट) झाल्यावर अंदाजित १,६०,००० ते २,००,००० प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात केली. पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारे उत्तम साधन असल्याने पुणे शहर अधिक हरित (Green) होण्यास मदत होईल. तसेच, उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे मेट्रोचे हे यश महामेट्रोचे अभियंते, कर्मचारी आणि प्रशासनाचे परिश्रम तसेच पुणेकरांच्या सहकार्याचे प्रतीक आहे.

– पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर मेट्रो ट्रेन आणि स्थानक परिसरात सुरक्षा पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून विशेष गस्त सुरू

पुणे मेट्रोने आपल्या प्रवासाच्या सुरक्षिततेला आणि शिस्तीला महत्त्व देत रामवाडी ते वनाझ आणि पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांमध्ये विशेष गस्त सुरू केली आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवास अनुभवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गिकांवर संबंधित स्टेशनवरील सुरक्षा पर्यवेक्षक (Security Supervisors) आणि त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा कर्मचारी (Security Staff) मिळून ही गस्त घालणार आहेत.

या गस्तीचा मुख्य उद्देश मेट्रो गाड्यांमध्ये होणारे गैरवर्तन रोखणे हा आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरवर्तन रोखणे, मेट्रो ट्रेन मध्ये आणि स्थानक परिसरात कचरा करणे, मेट्रो ट्रेन मध्ये खाद्यपदार्थ खाणे/ भोजन करणे, आणि मेट्रो कायद्याशी विसंगत वर्तन थांबवणे यांचा समावेश आहे. दोन्ही मार्गिकांवर विविध स्थानकांदरम्यान दिवसातून किमान पाच ते सहा वेळा हे पथक नियमितपणे गस्त घालणं आहे. गस्तीवर असलेले सर्व कर्मचारी हे निश्चित गणवेशात असणार आहेत आणि आपल्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहतील. या गस्ती दरम्यान कोणीही प्रवासी गैरवर्तन करताना आढळ्यास त्याला मेट्रो नियमांनुसार दंड करण्यात येईल, पण गैरवर्तन हे कायदा सुव्यवस्तेच्या नियमाच्या आधीन असेल तर त्या व्यक्तीला संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येईल.

पुणे मेट्रो प्रशासनाने या विशेष अभियानामुळे मेट्रोमधील प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण अधिक चांगले होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: