Pune Rain News | गेल्या चार वर्षात झालेल्या पावसाळी लाईन च्या कामाची माहिती प्रसिद्ध करा | आपले पुणे आपला परिसर संस्थेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

HomeBreaking News

Pune Rain News | गेल्या चार वर्षात झालेल्या पावसाळी लाईन च्या कामाची माहिती प्रसिद्ध करा | आपले पुणे आपला परिसर संस्थेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 02, 2026 7:08 PM

PMC Standing Committee | सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड
PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?
PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

Pune Rain News | गेल्या चार वर्षात झालेल्या पावसाळी लाईन च्या कामाची माहिती प्रसिद्ध करा | आपले पुणे आपला परिसर संस्थेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Pune Rain – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाने गेल्या चार वर्षात शहरात कुठल्या ठिकाणी पावसाळी लाईन ची कामे केली आहेत. याची माहिती महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करावी, अशी मागणी आपले पुणे आपला परिसर या संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune PMC News)

आज शहरात तुफान आणि मुसळधार पाऊस झाला.  प्रचंड वाऱ्याच्या आणि पावसाच्या माऱ्यामुळे जवळपास पूर्ण शहर हे तुंबले होते. अर्थात पावसाचा माराही जोरात होता.
यानिमित्ताने  चार वर्षांमध्ये पावसाळी लाईनचे काय काम झाले कुठे कुठे झाले याची सर्व माहिती पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असे संस्थेने म्हटले आहे. त्यमुळे नेमके काम झाले का नाही?  झाले असल्यास अर्धवट झाले का?  याचा मनपा प्रशासनाला अंदाज येऊन पावसाळी काळामध्ये उपाय योजना आतापासून करता येतील. पावसाळा सुरळीत जावा यासाठी ही सर्व माहिती क्षेत्रीय कार्यालय मुख्य कार्यालय यांच्याकडून तातडीने मागून घ्यावी. जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च झाला आहे. नगर अभियंता यांना याबाबत एक तातडीने आढावा घेण्याचे आदेश देखील द्यावेत. असे निवेदनात संस्थेने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: