Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Homeadministrative

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Ganesh Kumar Mule Jun 09, 2025 8:49 PM

Janata Vasahat TDR | जनता वसाहत TDR प्रमाणे बीडीपी बाबत देखील निर्णय घ्या | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या!
PMPML Pune | गणेश उत्सवात रात्री १२ नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत | पीएमपी प्रशासनाची माहिती 

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

 

Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहरात पालखी मार्गावर केलेल्या कामांची आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी आढावा बैठक घेतली.

आज  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुसरा मजला या ठिकाणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख व अधिकारी यांच्या समवेत पालखी मार्गावर केलेल्या कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांचे पुणे शहरात आगमनापूर्वी पालखी संबंधित कामांची माहिती घेतली व सर्व उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख यांना दिले.

याप्रसंगी मुख्य उद्यान अधिकारी अशोक घोरपडे, मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संदीप कदम, उप आयुक्त (सांस्कृतिक विभाग) सुनील बल्लाळ, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, अधीक्षक अभियंता (मलनि:सारण) जगदीश खानोरे इत्यादी खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.