Kothrud Electricity | वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याबाबत राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड महावितरण ला निवेदन

HomeBreaking News

Kothrud Electricity | वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याबाबत राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड महावितरण ला निवेदन

Ganesh Kumar Mule May 30, 2025 1:40 PM

Republic Day | श्री साई सेवा संस्था शिवणे येथील मतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन
NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
NCP Youth Vs BJP | काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी

Kothrud Electricity | वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याबाबत राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड महावितरण ला निवेदन

 

Girish Gurnani – (The Karbhari News Service) – वारंवार वीज जाण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढल्याबाबत कोथरूड महावितरण चे अभियंता  राजेश काळे यांना राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Kothrud Pune)

याबाबत कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले कि, कोथरूड मधील बऱ्याच भागात वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात पावसामुळे तर अजूनच वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा वीज गेल्यास ती पुन्हा 3-4 तासांनी येत आहे, तर काही भागात याहून अधिक वेळ वीज जात आहे. तसेच विजेचा भार कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद पडत आहेत व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व हाल सुद्धा होत आहे.

या सर्व विषयास अनुसरून राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने आज कोथरूड महावितरण अभियंता  राजेश काळे यांना निवेदन देण्यात आले व याकडे लक्ष देऊन वारंवार वीज खंडीत होणार नही याची दक्षता घेतली पाहिजे असे नमूद करण्यात आले.

या वेळी महावितरण कडून  अश्वासन दिले आहे की या विषयावर गांभीर्याने उपयोजना करू आणि वारंवार वीज खंडीत होण्यापासून नागरिकांची सुटका करू.