Pune City Survey | बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश

Homeadministrative

Pune City Survey | बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश

Ganesh Kumar Mule May 29, 2025 9:28 PM

Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 
Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी
Yoga Day बावधन-कोथरूडमध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने भव्य योग महोत्सवाचे आयोजन

Pune City Survey | बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश

 

Pune News – (The Karbhari News Service) – बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत.

बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली.

या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे :
• मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार.
• जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील.
• बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता.
• शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर.
• बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार.

दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की, “हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: