Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी

HomeBreaking Newsपुणे

Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी

गणेश मुळे Jun 03, 2024 2:36 PM

Ramraksha Pathan Pune | Hemant Rasane | ७५ हजार पुणेकरांनी केले रामरक्षा पठण
Electric Vehicle : Charging Point : पुणे महापालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये होणार इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट! 
Hemant Rasne | हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी

| नागरिकांना लाईव्ह निकाल पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची सुविधा

 

Pune Lok Sabha Election Results – (The Karbhari News Service) –  संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल (Lok Sabha Election Results 2024) उद्या जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एनडीए (NDA) सरकारच्या विजयात पुण्यातून एका जागेची भर पडणार असल्याचेही एक्झिट पोलमधून दिसून आले आहे. तसेच स्थानिक भाजप नेत्यांकडून देखील विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Constituency) निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemanat Rasane) यांच्याकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली असून ३७० किलो पेढ्यांचे वाटप केले जाणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलमधून स्पष्ट झाल आहे. देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघ भाजपाकडून लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, दत्त मंदिर परिसर येथे नागरिकांसाठी एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ३७० किलो पेढे वाटले जाणार आहेत.

दरम्यान पुणेकरांना निकाल लाईव्ह पाहता येण्यासाठी भाजपाकडून एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी विजयोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी केले आहे.