PMC Pune Retired Employees | आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त – डॉ दत्ता कोहिनकर यांनी दिला मंत्र | पुणे महापालिकेचे 156 कर्मचारी सेवानिवृत्त!

HomeपुणेBreaking News

PMC Pune Retired Employees | आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त – डॉ दत्ता कोहिनकर यांनी दिला मंत्र | पुणे महापालिकेचे 156 कर्मचारी सेवानिवृत्त!

गणेश मुळे Jun 01, 2024 5:56 AM

PMC Chief Security Officer | मुख्य सुरक्षा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे! 
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन 
PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards

PMC Retired Employees | आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त – डॉ दत्ता कोहिनकर यांनी दिला मंत्र | पुणे महापालिकेचे 156 कर्मचारी सेवानिवृत्त!

PMC Retired Employees  – (The Karbhari News Service) – मे, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 156 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune Municipal Corporation)


या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते  डॉ. दत्ता कोहिनकर (Dr.Datta Kohinkar) अध्यक्ष, विपश्यना ध्यान केंद्र, पुणे हे उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली तसेच कुणाला पेन्शन किंवा देय रकमा देण्यात काही अडचण असल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे नमूद करून करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.  माधव जगताप उपायुक्त यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या काही इच्छा असल्यास त्या त्यांनी पूर्ण कराव्यात असे नमूद करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. दत्ता कोहिनकर यांनी निवृत्त सेवकांना मार्गदर्शन करताना तुम्ही स्वतःची व स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. स्वतःवर प्रेम केले पाहिजे,  जेणेकरून आपले मन व शरीर स्वस्त राहण्यास मदत होईल.  आपले शरीर स्वस्थ तर सर्व दुनिया स्वस्त, असा मंत्र त्यांनी दिला. उद्या पासून सर्वांनी आरशासमोर उभे राहून स्वतःला आरशात पाहून आय लव यू म्हटले पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होऊन आपले जीवन सुखी होईल. असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले.