Dr Ramesh Shelar | तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन! | उच्च स्तरीय चौकशी करण्याची डॉ रमेश शेलार यांची मुख्य सचिवांकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

Dr Ramesh Shelar | तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन! | उच्च स्तरीय चौकशी करण्याची डॉ रमेश शेलार यांची मुख्य सचिवांकडे मागणी

गणेश मुळे Jun 01, 2024 5:41 AM

Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी
Dr Ramesh Shelar | अकार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्तांकडे कसा? डॉ रमेश शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न 
Dr Ramesh Shelar PMC | मुख्य अभियंता (विद्युत) पद भरताना अनियमितता झाली असल्याचा डॉ रमेश शेलार यांचा आरोप | आस्थापना विभागाची चौकशी करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

Dr Ramesh Shelar | तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन! | उच्च स्तरीय चौकशी करण्याची डॉ रमेश शेलार यांची मुख्य सचिवांकडे मागणी

PMC Pune Municipal Corporation  – (The Karbhari News Service) – तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांच्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या प्रकारची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) डॉ रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे केली आहे. (Pune Porsche Car Accident)
डॉ शेलार यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेचे हद्दीमधील कल्याण नगर या ठिकाणी असलेले बॉलर पब व इतर पब विषयी प्रसार माध्यमामध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे. प्रसिद्ध केलेल्या बातमी मध्ये म  विक्रम कुमार, तत्कालीन महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका व इतर यांचे बॉलर पबचे मालक यांच्या समवेत उपस्थित असलेला फोटो आलेला आहे.  बॉलर सह १४ पब वर कारवाई केल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बातमी मध्ये “ एरवी कुणालाही सहज न भेटणारे ” या लिखाणावरून सर्व सामान्य पुणेकर नागरिक व महानगरपालिकेतील आजी-माजी अधिकारी/कर्मचारी यांना महापालिकेच्या तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या वर्तनाविषयी शंका निर्माण होणेस वाव मिळत आहे. सम्बंधित वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे कार्यकाळात सेवकांचे गैरवर्तन या संबंधी केलेल्या शिक्षा याबाबत शंका निर्माण होत आहे. (Pune PMC News)
तसेच विक्रम कुमार व इतर अधिकारी आणि बॉलर पबचे मालक यांच्या समवेत उपस्थित असलेला फोटोसह प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी डॉ शेलार यांनी केली आहे.